आ.राहुल कुल यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर दौंड चे महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बाजवला आहे. यावेळी आ.कुल यांसोबत त्यांच्या मातोश्री माजी आमदार रंजनाताई कुल, त्यांच्या पत्नी कांचनताई कुल या उपस्थित होत्या. त्यांनी आपला मतदानाचा हक्क राहू येथील मतदान केंद्रावर जाऊन बजावला आहे. आपल्या विकास कामांची आणि नियोजित प्रकल्पांची पावती दौंडची सुज्ञ जनता नक्कीच देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.

काल दिवसभर सुरू असलेल्या पावसाने आज पहाटेपासून विश्रांती घेतल्याने याचा मोठा फायदा मतदानाची टक्केवारी वाढण्यात होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दौंड तालुक्यामध्ये अनेक मतदानकेंद्रांवर मोठी लगबग सुरु असून जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दिव्यांगांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे टॅग करण्याची प्रक्रिया करण्यात आल्याने मतदान केंद्र नेमके कुठे आहे, जवळ किंवा लांब आहे हे मतदारांना समजणार आहे.

visit : Policenama.com