आ.राहुल कुल यांच्या हस्ते बोरीभडक येथे २ कोटी ३० लाखांच्या कामांचे भूमिपूजन व उदघाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील बोरीभडक याठिकाणी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते आज गुरुवार दि.१८ जुलै रोजी सुमारे २ कोटी २९ लक्ष २६ हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडले.

यावेळी आमदार राहुल कुल यांनी बोलताना बोरीभडक येथील नवीन मुठा उजव्या कालव्यावर साकव (पूल) बांधण्यासाठी तसेच या भागाला वरदान ठरणारी खूपटेवाडी फाटा व पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करण्यासाठी आपण शासनाकडे सतत पाठपुरावा करत आहोत त्याला लवकरच यश मिळेल व हे दोन्ही महत्वाचे प्रश्न नजीकच्या काळात मार्गी लागतील अशी मला अपेक्षा आहे असे सांगितले. यावेळी तेथे ऊपस्थित नागरिकांशी संवाद साधला व स्थानिक समस्या तसेच ग्रामस्थांचा विविध मागण्या जाणून घेतल्या.

मौजे बोरीभडक ता. दौंड येथील भूमिपूजन करण्यात आलेली कामे पुढील प्रमाणे :-

१) राम- ९ ते बोरीभडक रस्ता (एल – ९१) – अंतर १.३० किमी – मंजूर रक्कम – ९७ लक् २१ हजार

२) राम ९ ते चंदनवाडी रस्ता अंतर – १.०० किमी – मंजूर रक्कम – ६२ लक्ष ०५ हजार

३) बोरीभडक गावठाणच्या दक्षिण बाजुने उत्तर – दक्षिण असा अंतर्गत रस्ता – मंजूर रक्कम – १० लक्ष

४) बोरीभडक येथे अंतर्गत रस्ता – मंजूर रक्कम – १० लक्ष

५) मौजे बोरीभडक येथे खंडोबा मंदिरासमोर सभामंडप – मंजूर रक्कम – १० लक्ष

मौजे बोरीभडक, ता. दौंड येथील उद्घाटन करण्यात आलेली कामे पुढील प्रमाणे :-

१) राम ९ पुणे सोलापूर रोड ते बोरीभडक रस्ता – मंजूर रक्कम – १५ लक्ष

२) मौजे बोरीभडक चंदनवाडी येथे गटार योजना – मंजूर रक्कम – १० लक्ष

३) बोरीभडक येथे अंतर्गत रस्ता – मंजूर रक्कम – ५ लक्ष

४) बोरीभडक येथे सामाजिक सभागृह – मंजूर रक्कम – ५ लक्ष

४) बोरीभडक येथे अंतर्गत रस्ता – मंजूर रक्कम – ५ लक्ष

एकूण रक्कम सुमारे २ कोटी २९ लक्ष २६ हजार