MLA Raju Karemore | पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार कारेमोरेंना अटक

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Raju Karemore | भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडीचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार राजू कारेमोरे (MLA Raju Karemore) यांना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. राजू कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी (31 डिसेंबर) रोजी थेट पोलिस ठाण्यात गोंधळ घातला होता. यानंतर कारेमोरे यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, आमदार राजू कारेमोरे (MLA Raju Karemore) यांचे 2 व्यापारी मित्र 31 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आमदारांच्या घरून 50 लाख रुपयांची रोखड एका आरटीका गाडीतून तुमसरकडे घेऊन जात होते. यावेळी मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्टँग रूमच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गाडी चालकाला इंडिकेटर का दिले नाही? म्हणून गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीतील यासीम छवारे (Yasim Chhaware) आणि अविनाश पटले Avinash Patale) या दोघांनी याबाबत विचारणा केली असता तेव्हा पोलीस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही मारहाण केली.

 

 

दरम्यान, बंदोबस्तावर उपस्थित असणारे पोलिश उप निरीक्षक राणे (PSI Rane) यांनीही फिर्यादी यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आमदार राजू कारेमोरे यांनी संबधित पोलिस उपनिरीक्षकावर कार्यवाही करण्याची मागणी करत पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली होती. यानंतर त्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

 

Web Title :- MLA Raju Karemore | ncp mla raju karemore arrest bhandra district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ahmednagar Crime | कोपरगाव शहर हादरलं ! भरदिवसा सोमवारच्या आठवडी बाजारात तरुणाचा खून

Joint CP Dr Ravindra Shisve | केंद्र शासनाकडून पुण्याचे ज्वाईंट सीपी डॉ. रवींद्र शिसवेंना IG Empanelment; सह आयुक्त म्हणाले – ‘बहुमान मिळाल्यानं आनंद’

Anil Parab | केंद्राने दिलेली मुदत संपल्याने मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाईची शक्यता

Corporator Dhiraj Ghate | चाळीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यात वाढ, पालिकेने पुनर्विचार करावा; नगरसेवक धीरज घाटेंचे आयुक्तांना निवेदन

Pune Traffic Police | 5 ते 10 जानेवारी दरम्यान ‘या’ वेळेत संभाजी पुलावरील वाहतूक बंद राहणार

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 149 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी