शरद पवार माझ्यासाठी सदैव ‘आदर्श’ ! आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून भाजप प्रवेशाची घोषणा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दोन-तीन महिन्यांपासुन उस्मानाबद जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज (शनिवारी) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

माझ्यासाठी शरद पवार हे सदैव आदर्श राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. माजीमंत्री पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. राणाजगजितसिंह हे पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांनीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने हा राष्ट्रवादीला आत्‍तापर्यंतचा सर्वात मोठा धक्‍का असल्याचे मानले जात आहे. यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पिचड पिता-पुत्रांनी तसेच सचिन आहिर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यानंतर सातार्‍याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता चक्‍क शरद पवार यांच्या जवळच्या नातेवाईक आमदारानेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानं मोळी खळबळ उडाली आहे.