MLA Ravi Rana | ‘जर कोणी दम देत असेल तर त्याला…’, रवी राणांच्या वक्तव्यावरुन राणा-कडू यांच्यातील वाद पुन्हा पेटणार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) आणि रवी राणा (MLA Ravi Rana) याच्यात मागील 15 दिवसांपासून सुरु असलेला वाद राज्यात चांगलाच गाजला. त्यांच्यातील आरोप प्रत्यारोप विकोपाला गेले होते. अखेर रवी राणांनी (MLA Ravi Rana) एक पाऊल मागे घेत या वादावर पडदा टाकला. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद संपला असं जाहीर झाल्यानंतर आज रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या दोघांमध्ये पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

 

आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) म्हणाले, रवी राणाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दम खाल्ला नाही, बच्चू कडू तर कोणीच नाही. रवी राणा हा एकदा नव्हे तर दहा वेळा प्रेमाची भाषा करेल. पण जर कोणी दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची धमक आहे. पहिल्यांदा चुकी केली म्हणून माफ करतोय असे सांगत मंगळवारी बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली होती. आज त्या टीकेला राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

त्यांनी तलवार घेऊन यावं, मी…
रवी राणा यांना प्रत्युत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, रवी राणा यांचे स्वागत करतो, त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फुल घेऊन तयार राहतो.
मी कुठल्या चौकात यावं हे सांगावं, मी तयार आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
मी मंगळवारी बोलताना कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे राणांच्या या वक्तव्याची दखल मी घेत नाही,
असंही ते म्हणाले. याबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

कोण निवडून यायचं हे मतदार ठरवतील
कोण निवडून यायचं हे मतदार ठरवतील, त्यामुळे जनता ठरवेल की मी निवडून यायचं की नाही असं बच्चू कडू म्हणाले.
पुन्हा या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत असं मी मंगळवारी म्हणालो होतो.
त्यावेळी मी माझ्या प्रहार संघटनेची भूमिका मांडली होती. त्यावेळी मी रवी राणा यांचं नाव घेतलं नव्हतं असंही बच्चू कडू म्हणाले.

 

Web Title :- MLA Ravi Rana | mla ravi rana criticized bachchu kadu on dispute maharashtra news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Cabinet Meeting | रवी राणांसोबतचा वाद मिटताच बच्चू कडूंना शिंदे-फडणवीसांकडून मोठं गिफ्ट

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले-‘राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत’

Abdul Sattar | ‘माझ्या मतदारसंघात दोन नंबरचे पप्पू…’, अब्दुल सत्तारांचा आदित्य ठाकरेंना टोला