MLA Ravi Rana | त्यांची सेना ही उद्धव काँग्रेस सेना, पक्षाच्या नवीन नावावरून आमदार रवी राणांची ठाकरेंवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Ravi Rana | मुळ शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटाला निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena of Balasaheb) तर मुळ शिवसेनेला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray), असे नाव दिले आहे. यावरून आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा समर्थक आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी शिवसेनेला मिळालेल्या नावावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

आमदार रवी राणा म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही खरी शिवसेना नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाळासाहेबांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यांची सेना ही उद्धव काँग्रेस (Congress) सेना आहे. येत्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप (BJP) विजय मिळवेल.

दरम्यान, शिंदे गटाच्या शितल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी शिंदे गटाला नाव मिळाल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, शिवसैनिकांच्या मनातील नाव बाळासाहेबांची शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळाले आहे. ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, आमच्या नावामध्ये प्रथम बाळासाहेब नंतर पक्षाचे नाव आहे.
बाकीच्यांना जे मिळाले आहे त्यात प्रथम मी नंतर बाळासाहेब. लोकांना याचा अर्थ कळत असेल.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही आमचे चिन्ह आयोगाकडे देऊ.
मात्र, हे चिन्ह तात्पुरते असेल, भविष्यात धनुष्यबाण हेच चिन्ह (Dhanushyaban Symbol) आम्हाला मेरीटवर मिळेल.

Web Title :- MLA Ravi Rana | mla ravi rana criticized uddhav thackeray over shivsenas new name

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा