MLA Ravi Rana On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व’ – आमदार रवी राणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Ravi Rana On Bhagat Singh Koshyari | मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मग मुंबईला (Mumbai) देशाची आर्थिक राजधानी म्हणताच येणार नाही, असे संतापजनक वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. यावर राज्यभरातून संतप्त पडसाद उमटत असून सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

 

दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) आणि आमदार रवी राणा यांनी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केले आहे. विशेष म्हणजे, कोश्यारी यांनी ज्या कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्तव्य केले, त्यावेळी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा आणि आमदार नितेश राणे उपस्थित होते.

 

आमदार रवी राणा यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जे वक्तव्य केले आहे ते भौगोलिक दृष्ट्या केले असेल. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. मुंबई हे देशातील सर्वात हायटेक शहर आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईची सुरूवात गिरणी कामगारांपासून झाली होती. मात्र, त्यानंतर तिथे अनेक व्यापारी आणि जाती – धर्माचे लोक आलेत. त्यामुळे मुंबईचा विकास करण्यात सर्वांचा हातभार आहे. मुंबई ही सर्वांची आहे.

मुंबईतील जे. पी. रोड, अंधेरी (प) येथे दाऊद बाग जंक्शन परिसरातील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला.
यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की,
मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.
गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.

 

या कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर,
नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी इ. उपस्थित होते.

 

Web Title : – MLA Ravi Rana On Bhagat Singh Koshyari | MLA ravi rana on controversial statement of bhagat singh koshyari

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा