MLA Ravi Rana | आमदार रवी राणा यांचा सूर बदलला ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर आता भाजपवर निशाणा..

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइऩ – MLA Ravi Rana | अमरावती शहरातील (Amravati News) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सरकारने प्रशासनावर दबाव आणून हा पुतळा काढल्याचा जोरदार आरोप आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला होता. हा आरोप काल (रविवारी) राणा दांपत्याने टीका करत केले होते. दरम्यान आता रवी राणा यांचा सूर बदलला की काय? असा सवाल सर्वत्र उपस्थित होतो आहे. कारण आज राणा यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या राजापेठ चौकातील उड्डाणपुलावर (12 जानेवारीला) मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या रवी राणा यांनी घेतल्या नव्हत्या. हा पुतळा बसवल्याने वाद निर्माण झाला होता. 16 जानेवारी रोजी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने हा पुतळा काढला. नंतर, अमरावतीमध्ये राजकारण चांगलेच तापले. तेव्हा त्यांनी यशोमती ठाकूर, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला होता.

यानंतर रवी राणा म्हणाले, ”अमरावती महानगरपालिकेमध्ये (Amravati Municipal Corporation) भाजपची (BJP) सत्ता असताना देखील त्यांनी पुतळा बसवायला परवानगी दिली नाही असा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात मी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारणा करणार असल्याचेही ते म्हणाले. तर, ‘ज्या व्यावसायिकांकडून लाच मिळते त्यांच्यासाठी अमरावती महापालिका रात्री-बेरात्री बैठका घेऊन परवानगी देते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी द्यायला अमरावती महापालिकेकडे वेळ नाही’ अशी गंभीर टीकाही त्यांनी केली. दरम्यान, येत्या शिवजयंतीला शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवणार आहे. त्यासाठी पालकमंत्री, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी रीतसर परवानगी द्यावी अशी मागणी देखील रवी राणा यांनी केली.

Web Title : MLA Ravi Rana | ravi ranas criticism on bjp after chief minister uddhav thackeray shivaji maharaj statue issue in amaravati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी