MLA Ravindra Dhangekar | पराभवामुळे त्यांचे डोळे उघडले, 40 टक्के सवलतीच्या निर्णयावरुन रवींद्र धंगेकरांचा सरकारला टोला (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) मिळकत करातून देण्यात येणारी 40 टक्के सवलत रद्द करण्यात आली होती. मात्र सर्वच पक्षांकडून याला विरोध होत असल्याने शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) 40 टक्के मिळकतकराची (Pune PMC Property Tax) सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरुन कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. कसब्यातील पराभवामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता 40 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) म्हणाले, मागील अनेक वर्षापासुन पुणे शहरातील नागरिकांना मिळकतकरात सवलत (Property Tax Discount) मिळावी, यासाठी आम्ही सर्वजण लढा देत होतो, त्या लढ्याला यश आले असून काल (शुक्रवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शहरातील मिळकतकरात 40 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. धंगेकर पुढे म्हणाले, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत, असा टोला त्यांनी सरकारला लगावला.
पुणे शहरामध्ये जवळपास दहा लाख मिळकती असून त्या सर्व मिळकतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकतकर वसुली करत होती. यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी मी नगरसेवक असताना सभागृहात करत होतो. आता आमदार झाल्यानंतर हीच मागणी विधिमंडळात केली होती. त्या मागणीला काही प्रमाणात यश आल्याचं म्हणावं लागेल. कारण काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत 40 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने 40 टक्के मिळकतकरात सवलत देण्याचा निर्णय घेतला तो नुकत्याच झालेल्या
कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे घ्यावा लागला.
त्यामुळे मी कसबा मतदार संघातील नागरिकांचे आभार मानतो, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.
तसेच मुंबई महापालिकेने (BMC) जसे 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना सवलत दिली आहे.
तशी सवलत पुण्यातील घरांना मिळावी अशी मागणी मी विधिमंडळात करणार आहे.
आमची ही मागणी मान्य झाली नाही तर रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Web Title :- MLA Ravindra Dhangekar | because of defeat in kasba peth bye election shinde fadnavis government reduced property tax in pune said by mla ravindra dhangekar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीचा गोंधळींबरोबर गोंधळ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल
Chandrashekhar Bawankule | शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत 48 जागा? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं