MLA Ravindra Dhangekar | भाजपकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ! आमदार रवींद्र धंगेकर यांचे मत (Video)

सभा उधळण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाहीची थट्टाच; भाजपच्या धमकीचा केला निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MLA Ravindra Dhangekar | पुण्यात ‘दडपशाहीच्या विरोधात लोकशाही रक्षणासाठी : निर्भय बनो’ ही सभा उधळून लावू, अशी धमकी भाजपने दिली असून याचा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज तीव्र शब्दांत निषेध केला. अशी धमकी देणे ही भाजपकडून होणारी लोकशाहीची थट्टा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराही आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपला दिला. (Pune Congress)

साने गुरूजी स्मारकातील सभागृहात उद्या (ता. 9) ही सभा होणार आहे. अभिनेते अमोल पालेकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, विधीज्ञ ॲड. असिम सरोदे, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह अन्य वक्ते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. (MLA Ravindra Dhangekar)

लोकशाहीचे रक्षण व्हावे, लोकशाही जिवंत रहावी म्हणून ही सभा होत आहे. याला विरोध करणे, सभा उधळण्याचा इशारा देणे, दमदाटीपणा करणे हे लोकशाहीत बसते का? भाजपकडून असे लोकशाहीविरोधी कृत्य वाढत चालले आहे. भाजप आपल्या कृतीतून ‘दडपशाहीच्या विरोधात लोकशाही रक्षणासाठी’ या विषयावर सभा घेणे योग्य आहे, हे दाखवून देत आहे, याकडे आमदार रवींद्र धंगेकर यांनी लक्ष वेधून घेतले.

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे. पण, भाजपचे लोक मुद्द्याची लढाई ही गुद्द्यावर आणत आहेत. असे असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. जशास तसे उत्तर देण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. पोलिसांनी या विषयात हस्तक्षेप करून दमदाटी करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Conduct Elections On Ballot | EVM विरोध आता गावपातळीवर! सांगलीतील ‘या’ गामपंचायतीचा ठराव, ‘निवडणुका बॅलेटपेपरवर घ्या’

Maharashtra Politics Opinion Poll 2024 | आगामी निवडणुकीत ‘महायुती’ची वाट कठीण, महाराष्ट्रात काय असेल स्थिती, सीव्होटर सर्व्हेतील अंदाज जाणून घ्या…

Pune BJP | विविध क्षेत्रातील सुमारे 200 महिलांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश

Maharashtra Budget Session | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीला; अर्थमंत्री अजित पवार 28 ला सादर करणार अर्थसंकल्प

खुन करुन फारार झालेल्या तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक