
MLA Ravindra Dhangekar – Pune PMC Property Tax | मुंबईच्या धरतीवर पुण्यातही 500 चौ. फूटांचा मिळकत कर माफ करावा; आमदार रविंद्र धंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे : MLA Ravindra Dhangekar – Pune PMC Property Tax | मुंबईच्या धरतीवर पुणे शहरातील ५०० चौ.फूटांपर्यंतच्या सदनिकांचा मिळकत कर रद्द करावा, अशी मागणी कॉंग्रेस (Congress) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) कसबा मतदारसंघाचे (Kasba Peth Assembly Constituency) आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. (MLA Ravindra Dhangekar – Pune PMC Property Tax)
आमदार रविंद्र धंगेकर यांनी राज्य शासनाने पुणेकरांना (Punekar) मिळत असलेली मिळकत करातील ४० टक्के सवलत पुर्ववत करणार, शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांच्या पुर्नबांधणीला परवानगी मिळावी तसेच मुंबईच्या धरतीवर ५०० चौ. फूटांपर्यंतच्या निवासी मिळकतींचा मिळकत कर माफ करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आश्वासन दिले होते. दोन महिन्यांपुर्वी कसबा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर पहिल्या दिवसांपासून त्यांनी या प्रश्नांचा पाठपुरावा सुरु केला आहे. त्यापैकी मिळकत करातील ४० टक्के सवलत पुर्ववत करण्याचा निर्णय राज्य शासनाने (Maharashtra State Govt) मान्य देखिल केला असून त्याची अंमलबजावणी देखिल होत आहे. (MLA Ravindra Dhangekar – Pune PMC Property Tax)
यासोबतच शनिवार वाडा (Shaniwar Wada) ही हेरीटेज वास्तू (Heritage Building) असल्याने केंद्र शासनाच्या नियमानुसार शनिवार वाड्याच्या १०० मी. परिसरात बांधकामांना बंदी असल्याने येथील धोकादायक जुन्या वाड्यांचा (Pune’s Old Wadas ) प्रश्न आणखीनच गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी राज्यातील ४८ खासदारांसोबतच, केंद्रीय पुरातत्व विभाग (Central Archaeological Department), केंद्रीय नगरविकास विभाग (Central Urban Development Department) आणि संबधित विभागांना पत्र पाठवून या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे आवाहन केले आहे. तसेच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुंबईच्या धरतीवर पुणे शहरातील ५०० चौ.फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मिळकतींचा कर माफ करण्याची मागणी केली होती. तिचा पाठपुरावा करण्यासाठी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत पाठपुरावा सुरू केला आहे.
Web Title :- MLA Ravindra Dhangekar – Pune PMC Property Tax | 500 sq. in Pune on the land of Mumbai. Pune PMC Property tax should be waived; Demand of MLA Ravindra Dhangekar to Chief Minister
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update