MLA Ravindra Dhangekar | रविंद्र धंगेकरांची विधानसभेत पहिली लक्षवेधी, पुणेकरांसाठी केल्या ‘या’ महत्त्वाच्या मागण्या (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत सध्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरु आहे. या अधिवेशनामध्ये पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे (Kasba Assembly Constituency) आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी पहिल्यांदाच लक्षवेधी मांडून पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहाच्या पटलावर आणले. मुंबई शहरात 500 चौ. फुटांच्या आतील घरांना मिळकत कर (Property Tax) माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पुणेकरांना देण्यात आलेली सवलत रद्द करुन त्याची वसुली केली जात आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये तीव्र असंतोषाची भावना असून राज्य शासनाने पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation (PMC) वसुली थांबविण्याचे आदेश द्यावेत व पुणे शहरातील 500 चौ. फुटाच्या आतील घरांना कर माफ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी केली.

 

 

लक्षवेधीत काय म्हटले?
पुणे महापालिकेने घरमालकांना देण्यात येणारी मिळकत करातील 40 टक्के सवलत रद्द केली आहे. त्यामुळे याचा फटका अनेक पुणेकरांना बसत आहे. राज्यात दिवसेंदिवस महागाई वाढत असताना पुणेकरांवर हा आर्थिक बोजा वाढत आहे. यातच मिळकत करात दिली जाणारी 40 टक्के सवलत बंद केल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 1970 सालापासून 2018 पर्यंत मिळालेल्या सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात पुणे महानगरपालिकेने वसुली व व्याज घेण्यावर स्थगिती द्यावी असा ठराव करुन शासनाकडे पाठविला असतानाही याबाबत शुद्धीपत्रक शासनाने अद्याप काढले नाही.

मुंबई शहरामध्ये 500 चौ. फुटांच्या आतील घरांना सवलत दिली जाते.
मात्र, पुणेकरांना देण्यात आलेली सवलत रद्द करुन त्याची वसुली केली जात असल्याने पुणेकरांमध्ये असंतोषाची भावना आहे.
पुणेकरांची भवना लक्षात घेऊन राज्या शासनाने चौकशी करुन सुरु असलेली वसुलीला स्थगिती देऊन
कर सवलत कायम करण्याची तसेच मुंबई प्रमाणे पुणे शहरातील 500 चौ. फुटाच्या आतील घरांना कर
माफ करण्यासंर्भात करावयाची कारवाई शासनाने पूर्ण करुन पुणेकरांना दिलासा द्यावा,
अशी मागणी रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी केली.

 

Web Title :- MLA Ravindra Dhangekar | Ravindra Dhangekar’s first attention in the Legislative Assembly, ‘these’ important demands made for the people of Pune (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Industries Minister Uday Samant | नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण 15 दिवसात आणणार – मंत्री उदय सामंत

Pankaja Munde | “…मग तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का?” पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Bhaskar Jadhav | आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन भास्कर जाधव परतले; नेमकं काय घडलं?