MLA Ravindra Dhangekar | शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसून जो मलिदा खाल्ला आहे, कधी तरी उघड होणारच; भीमा पाटस कारखाना घोटाळ्याबाबत रवींद्र धंगेकर यांनी स्पष्टच सांगितले

संजय राऊत सभा घेऊन उघड करणार घोटाळा

 

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Ravindra Dhangekar | शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसून हा जो मलिदा खाला आहे, कारखाना बंद पाडून त्याच्याकडे दुसऱ्या पद्धतीने बघून लुटायचे काम केले. त्यामुळे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी जो ५०० कोटींचा घोटाळा उघड केला आहे तो दौंड येथे सभा (Daund Sabha) घेऊन ते उघड करणार आहेत. अशी माहिती कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी दिली आहे.

 

दौंड दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. गावातील सहकाऱ्यांच्या भेटी गाठी त्यांनी यावेळी घेतल्या.

 

यावेळी धंगेकर म्हणाले की, मी या तालुक्यांचा रहिवाशी असून माझे देखील या कारख्यानात शेअर आहेत, माझ्या वडिलांचे शेअर आहेत. त्यामुळे जर कुणी चुकीचं वागत असेल तर माझ्या सारखा कार्यकर्ता याबाबत आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्ष हा कारखाना बंद आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. या कारखान्यावर बोजा दाखवून ज्या पद्धतीने कुठल्यातरी कंपनीला चालवायला दिला आहे, संजय राऊत यांनी जो घोटाळा उघड केला आहे, तो लवकरच समोर येणार असून स्वतः संजय राऊत हा घोटाळा सभा घेऊन उघड करणार आहेत.

या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर (Bhima Patas Sahakari Sakhar Karkhana)
फक्त संजय राउतच नाही बोलत तर भाजपचे स्थानिक नेते देखील यावर बोलत असल्याचे आपण पाहिले आहे.
त्यामुळे हा मोठा भ्रष्टचार आहे. तो थोड्या दिवसात उघडकीस येईल असे देखील धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) म्हणाले आहे.
कसबा निवडणुकीचा राज्याच्या निवडणुकीला निश्चित फायदा होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (MVA Govt) येणार असल्याचे धंगेकर म्हणाले आहेत.

 

Web Title :- MLA Ravindra Dhangekar | The malida that has eaten sitting on the neck of the peasants, will be revealed sometime; MLA Ravindra Dhangekar spoke clearly about the Bhima Patas factory scam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Mahavitaran News | भरधाव वाहनाच्या धडकेने वीजखांब जमीनदोस्त; पर्यायी व्यवस्थेतून चाकणमधील वीजपुरवठा सुरु

Salman Khan | पुन्हा एकदा सलमान खानला ईमेल द्वारे जीवे मारण्याची धमकी; “अगली बार बडा झटका देंगे, ….”

Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…