पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Ravindra Dhangekar Visit Sasoon Hospital | पुणे शहराला ड्रग्सचा विळखा पडला आहे. कोवळी पिढी यामध्ये बरबाद होत आहे. ड्रग्स तस्कर (Drug Supplier ) ललित पाटीलवर (Lalit Anil Patil) तुम्ही नऊ महिने कोणत्या नियमात उपचार केले. सामान्य नागरिकांना रुग्णालयात दाखल करुन न घेता हकलून लावता. पाटील याच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोण आहेत त्यांची नावे जाहीर करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना पाठिशी घालू नका, अशी मागणी आमदार रविद्र धंगेकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी ललित पाटील याच्यावर उपचार करण्यासाठी शिंदे गटातील एका मंत्र्याचा फोन आल्याचा धक्कादायक खुलासा धंगेकर यांनी यावेळी केला. (MLA Ravindra Dhangekar Visit Sasoon Hospital)
आमदार रविंद्र धंगेकर यांनी मंगळवारी सकाळी ससून हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकुर यांची भेट घेत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र, त्यांच्या प्रश्नांना डॉ. ठाकुर यांनी समाधानकारक उत्तरे न देता आल्याने धंगेकर यांनी त्यांना फैलावर घेतले. यानंतर पत्रकार परिषद घेऊन ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी डीन डॉ. संजीव ठाकुर, अधीक्षक डॉ. किरण कुमार जाधव, उपअधीक्षक डॉ. सुजीत दिव्हारे उपस्थित होते. (MLA Ravindra Dhangekar Visit Sasoon Hospital)
रविंद्र धंगेकर यांनी अधिष्ठता डॉ. ठाकुर यांना यावेळी चांगलेच सुनावले. ते म्हणाले की ससूनमध्ये सर्वसामान्यांवर
लवकर उपचार केले जात नाहीत. मग, ललित पाटील व इतर कैद्यांना कोणत्या कारणामुळे तुम्ही नऊ महिने ठेवले ते सांगा.
डॉ. ठाकुर यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. त्यावर धंगेकरांनी तुम्ही मला गोल गोल फिरवू नका.
थेट उत्तरे द्या अथवा मला नोंदी असलेले रजिस्टर दाखवा. जोपर्यंत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत
मी माघार घेणार नाही, असा इशारा धंगेकर यांनी दिला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा