आमदार रोहित पवार खुळखुळ्याची काठी घेऊन थिरकतात तेव्हा …

पोलीसनामा ऑनलाइन – युथ आयकॉन म्हणून ओळखले जाणारे कर्जत जामखेडचे युवा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी रविवारी (ता. २७) रात्री कळवण तालुक्यातील डोंगऱ्यादेव उत्सवात सहभागी झाले होते. युवा आमदार रोहित पवारांनी (MLA Rohit Pawar) आदिवासी बांधवांसोबत नृत्य केले. ते सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. खुळखुळ्याची काठी घेऊन आदिवासी बांधवांबरोबर केलेले नृत्य सध्या सगळ्यांनाच आवडत आहे. नाशिकहून आमदार पवार (MLA Rohit Pawar) रविवारी (ता.२७) नाशिकच्या दौऱ्यावर असताना कॉलेजरोड परिसरातील ‘चाय टपरी’ येथे त्यांनी युवकांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ‘महिला सुरक्षा, बेरोजगारी, नोकर भरती, आयटी पार्क, राजकारणातील नेतृत्व’ या विषयावर युवकांनी पवारांना प्रश्न विचारले. त्यानंतर नाशिकचे सर्वच कार्यक्रम आटोपत रविवारी रात्री पवार गडावर दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी नांदुरी येथे डोंगऱ्यादेव उत्सवात भेट दिली. या उत्सवात आदिवासी बांधवांबरोबर खुळखुळ्याची काठी घेऊन नृत्यही केले. यावेळी पवार यांच्यासमवेत आमदार नितिन पवारदेखील थिरकले. पिंपळा येथून मोहबारी येथील जागरण उत्सवात ग्रामस्थांसमवेत घुंगराची काठी घेऊन फेर धरून ताल धरला. ग्रामस्थांकडून उत्सवाची सविस्तर माहिती करून घेतली. रात्री एकला नाशिककडे प्रयाण केले. आदिवासी बांधवांची कला, संस्कृती व आदरातिथ्य बघून आमदार रोहित पवार भारावले.

या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, जयश्री पवार, हिरामण खोसकर, धनंजय पवार, उदय जाधव, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक जगताप, राजेंद्र भामरे, राम चौरे, राजू पाटील, सुधाकर सोनवणे, डी. एम. गायकवाड, कैलास बहिरम आदी उपस्थित होते.