MLA Rohit Pawar | ‘गिरीश महाजनांना पैशांचा घमंड, म्‍हणून फोडाफोडीचे राजकारण’ – रोहित पवार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  MLA Rohit Pawar | cccचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाजपचे (BJP) नेते गिरिश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कोणतीही निवडणूक आली की फोडाफोडीचे राजकारण गिरीश महाजन अगोदर करत असतात. असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे. त्यावेळी ते आज (शुक्रवारी) जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

 

रोहित पवार  हे आज जळगाव येथील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
त्या दरम्यान बोलताना रोहित पवार म्हणाले की, कोणतीही निवडणूक आली की फोडाफोडीचे राजकारण गिरीश महाजन अगोदर करत असतात.
पैशांच्‍या ताकदीचे घमंड असल्‍यानेच ते करत आहेत. त्‍याचा वापर मतदान काळात केला जात असल्‍याने एकप्रकारे लोकशाहीला तळा जातो.
परंतु, लढत ही लोकशाहीच्‍या माध्‍यमातून झाली तर खरी ताकद जनतेसमोर येईल. असा हल्लाबोल त्यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्‍यावर केला आहे.

 

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, ED ची चौकशी महाराष्‍ट्रातच नाही, तर बाहेरच्‍या राज्‍यात देखील कारवाई सुरू आहे.
हे लोकशाहीला सोडून असून सुडाचे राजकारण केले जात असल्‍याची टीकाही त्यांनी केली आहे.
तसेच चौकशीवर ED काहीच बोलत नसून भाजपचे काही नेते समोर येवून चौकशीबाबत ईडीचा पुरावे दिल्‍याचे बोलत आहेत.
दरम्यान, एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे मोठे नेते आहेत. भाजपमध्‍ये असताना तेव्‍हाच त्‍यांची ताकद कमी करण्याचे काम भाजपमधील काही नेत्‍यांनी केले.
असं रोहित पवार  यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : MLA Rohit Pawar | mla rohit pawar target bjp leader and former minister girish mahajan boasts of money

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PIB Fact Check | मोदी सरकार नव्या योजनेंतर्गत नागरीकांना देणार 4000 रुपये? जाणून घ्या सत्य

PM-Kisan New Rules | ‘पीएम शेतकरी सन्मान निधी योजने’च्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या

Ajit Pawar | ‘…तर 100 टक्के क्षमतेने नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांना परवानगी देणार’ – अजित पवार