MLA Rohit Pawar | आजोबानंतर नातू क्रिकेटच्या मैदानात, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवारांची बिनविरोध निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे राजकारणासोबत क्रिकेट जगतात तितकेच सक्रीय असतात. आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचा नातू आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे देखील क्रिकेटच्या मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार (MLA Rohit Pawar) क्लब गटाकडून विजयी झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीनंतर रविवारी पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर (Gahunje Stadium) असोसिएशनच्या कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची अध्यक्षपदी (President) बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहित पवार यांच्या या निवडीमुळे क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पवार पर्व सुरु झाले आहे.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले…
MCA च्या सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल MCA च्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार. आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचं मार्गदर्शन, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांचा पाठिंबा. तसंच MCA चे अनेक मा. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली.

उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर (Secretary Shubhendra Bhandarkar), खजिनदार संजय बजाज (Treasurer Sanjay Bajaj) व सह सचिव संतोष बोबडे (Joint Secretary Santosh Bobde) यांचंही अभिनंदन. माजी अध्यक्ष अजय शिर्के (Former presidents Ajay Shirke) आणि रियाज बागवान (Riyaz Bagwan) यांचंही मोठं सहकार्य लाभलं.

 

क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता MCA च्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून
देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Web Title :- MLA Rohit Pawar | ncp mla rohit pawar elected as president of maharashtra cricket association

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar | अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं, म्हणाले – ‘लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली का?’

Lady Police Constable Suicide | धक्कादायक! नाईट ड्युटीवरुन येताच महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या