MLA Rohit Pawar | भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याचे उत्तर जनता निवडणुकीत देईल – रोहित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray group)  आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या घरावर मंगळवारी (दि. 18) मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला केला. यावर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याचे उत्तर जनता निवडणुकीत देईल, असे रोहित पवार (MLA Rohit Pawar) म्हणाले.

भास्कर जाधव हे या सरकारच्या विरोधात बोलत आहेत. आणि त्यामुळे जर का त्यांच्या घरावर हल्ले होत असतील, तर ते योग्य नाही. एखादा आमदार येऊन हवेत गोळ्या झाडतो, त्याच्यावर कारवाई होत नाही. पण सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या आमदारांवर गुंड हल्ले करतात. असले प्रकार आपण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही बघितले नाहीत. हे सर्व आज बघावे लागत आहे, आणि हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. यामुळे भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याचे उत्तर लोक निवडणुकीतून देतील, असे रोहित पवार (MLA Rohit Pawar) म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

भास्कर जाधव यांनी देखील या हल्ल्यामागे गृहमंत्रालय असल्याचे म्हंटले होते.
त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
माझ्या घराबाहेरील सुरक्षा रात्री अचानकपणे काढली गेली आणि त्यानंतर हल्ला करण्यात आला.
त्यामुळे माझी सुरक्षा काढण्याचे आदेश गृहखात्यानेच दिले असतील, असा दावा जाधव यांनी केला.

मंगळवारी (दि. 18) रोजी कुडाळ तालुक्याचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये मोठा मोर्चा निघाला होता.
यावेळी भास्कर जाधव यांनी भाषण केले होते.
त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर मुंबईत 300 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. तसेच त्यांनी भाजप (BJP) नेत्यांवर देखील टीका केली होती.
त्याच दिवशी रात्री त्यांच्या घरावर भ्याड हल्ला करण्यात आला होता.

Web Title :- MLA Rohit Pawar | rohit pawar reaction on bhaskar jadhav house attack

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा