Rohit Pawar | ‘खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवय’; रोहीत पवारांची फडणवीसांवर टीका

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price hike) दरांनी शंभरी पार केली आहे. इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे एकीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) राजकीय आरोप सुरु आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी पुराव्यासह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) इंधनाच्या करावरुन खोटं बोलत असल्याचा पर्दाफाश केला आहे. रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीसांचा एक व्हिडीओ ट्विट करुन भाजपची पोलखोल केली आहे. mla rohit pawar strongly criticized devendra fadnavis for his statement on petrol price hike

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं

खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे.
पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या कारतले 12 रुपये राज्यांना मिळताता असं हस्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं.
देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात (Maharashtra) नाही, अशी टीका आमदार रोहीत पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
यावर खोटं काय आणि खरं काय याची वस्तुस्थिती सांगणारा एक व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला आहे.

महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात

केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात (Tax) राज्याला किती पैसे मिळतात ? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या 32.90 रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात.
तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला 12 रुपये मिळत असल्याचे सांगता, असा टोला रोहित पवार यांनी फडणवीसांना लागावला.

हे शोभणार नाही

रोहित पवार म्हणाले, विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी 12 रुपये दिसत असतील तर याला काय म्हणायचं ? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही.
दिवसाढवळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणार नाही असे पवार म्हणाले.

काय म्हणाले होते फडणवीस ?

देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पुण्यात बोलताना म्हणाले होते की, पेट्रोल-डिझेल हे आपल्याकडे 30 रुपयांमध्ये मिळतं.
त्यावर काही कर आणि वाहतूक खर्च मिळून त्यावर केंद्र सरकार 32 रुपये कर लादते आणि त्यावर राज्य सरकारला 12 रुपये मिळतात. त्यावर राज्याकडून 30 रुपये खर्च आकारला जातो.
एकूण 100 रुपये पेट्रोलचे दर असेल तर 42 रुपये हे राज्य सरकारचे आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला होता.

Web Title : mla rohit pawar strongly criticized devendra fadnavis for his statement on petrol price hike

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

जर तुमच्याकडे आहे SBI चे ‘हे’ खाते तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील 2 लाख रूपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

Petrol Diesel Price Today | इंधन दरवाढ सुरूच; पेट्रोल 34 पैसे तर डिझेल 28 पैशांनी महागले

bollywood News | करीना कपूर खानने पुन्हा दिली GOOD NEWS, तिसर्‍या मुलाचा केला उल्लेख