MLA Sada Sarvankar | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना ‘त्या’ प्रकरणात पोलिसांकडून ‘क्लिन चीट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांना गोळीबार (Firing) प्रकरणात पोलिसांनी (Mumbai Police) क्लिन चीट (Clean Cheat) दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान (Ganesh Visarjan-2022) मुंबईतल्या प्रभादेवी इथं शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) आमने सामने आले होते. त्यावेळी स्थानिक आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचे निष्पन्न झाले.

प्रभादेवी परिसरात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांनी गोळीबार केला नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. बंदूक ही सदा सरवणकर यांचीच आहे. पण गोळी झाडणारा व्यक्ती दुसऱाच असल्याचा पोलिसांचा अहवालात सांगण्यात आलं आहे. ही बंदूक माझीच होती, पण ती गाडीत होती. कुणीतरी ती घेऊन येत असताना चुकून गोळी झाडली गेल्यांच सदा सरवणकर यांनी म्हटलं होतं.

पोलिसांनी सदा सरवणकर यांना क्लिन चिट दिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी
मात्र हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप केला आहे. अशा घटनांमुळे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था
(Law and Order) ढासळत आहे. पोलिसांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता आता हा अहवाल दिला आहे, त्यामुळे त्यांची विश्वासर्हताही कमी होत असल्याचे अहिर यांनी म्हटले.

काय आहे प्रकरण?

मागील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सुरु असताना प्रभादेवी (Prabhadevi) येथील मिरवणुकीत वाद झाला होता.
प्रभादेवी परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्ते
एकमेकांमध्ये भिडले. त्यानंतर मध्यरात्री दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली.
या राड्यावेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर
यांच्यावर गंभीर आरोप केला होता. आमदार सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला होता.

Web Title : MLA Sada Sarvankar | shivsena prabhadevi rada sada sarvankar gun bullet was fired by another person dadar police report

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Khadse | राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेवर मोठी जबाबदारी

IND vs AUS 4th Test | अहमदाबाद कसोटीत फिरकीपटू आर.अश्विनने माजी खेळाडू अनिल कुंबळेचा मोडला ‘तो’ रेकॉर्ड

Ramdas Kadam | रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीने घेतले ताब्यात