कोरोनाबाबत सतर्क रहा, आवश्यक ती काळजी घ्या, नागरीकांनी घाबरून जावू नये : आ.संदिप क्षीरसागर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी सतर्क रहा, सर्वांनी काळजी घ्यायला हवी, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. शक्य ती कामे घरीच राहून करावीत. प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे, नागरीकांनी याबाबत घाबरून जावू नये असे आवाहन आ.संदिप क्षीरसागर यांनी केले आहे. त्यांनी जिल्हा रूग्णालयातील कोरोनाच्या संदर्भात स्थापन केलेल्या कक्षाची पाहणी करत आरोग्य विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बीड जिल्हा रूग्णालयात कोरोनाच्या संदर्भात उपचार घेण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याची पाहणी आ.संदिप क्षीरसागर यांनी करत बीड विधानसभा क्षेत्रातील आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलतांना आ.संदिप क्षीरसागर म्हणाले की, बीड शहरात व ग्रामीण भागात दरारोज मोठ्या शहरातून येणार्‍याची संख्या अधिक आहे. याबाबत आरोग्य विभागाने अधिक काळजी घेवून येणार्‍या नागरीकांची तपासणी करावी सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. नगर परिषद, शाळा, महाविद्यालय, मोठ-मोठे सभारंभ, सार्वजनिक कार्यक्रम घेण्याची टाळावे. जिल्हाधिकारी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी, घाबरून जावू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, बालरोग तज्ञ डॉ.आंधळकर, डॉ.टाक यांच्यासह जिल्हा रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अशी घ्या काळजी :
सर्वांनी वैयक्तीक स्वच्छता राखावी, हात, पाय, तोंड स्वच्छ ठेवा, लहानसा आजार झाल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्या, कच्चे, नीट न शिजलेले मांस टाळावे, सर्दी, खोकला किंवा तापेचे लक्षण असल्यास मास्कचा वापर करावा, लांबच्या प्रवासाला जाण्या आधी प्राथमिक औषधे सोबत घ्या, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.