नवी मुंबई महापालिकेमध्ये येणार युतीची सत्ता ? आमदार संदीप नाईकांसह राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांबद्दल भाष्य केल्यानंतर देखील राष्ट्रवादीची डोकेदुखी संपण्याऐवजी आणखीन वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अनेक नेते मोठ्या प्रमाणावर पक्षांतर करून भाजपमध्ये जात आहेत. आता हा प्रकार महापालिकांमध्ये देखील होऊ लागला आहे.

नवी मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ५२ नगरसेवक आहेत. हे सर्वच्या सर्व नगरसेवक एकत्रितपणे राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणी  शिवसेना-भाजप युतीची सत्ता येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेबाहेर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. केवळ नगरसेवकच नव्हे तर आमदार संदीप नाईक हेदेखील भाजपच्या वाटेवर असून त्यांचे वडील गणेश नाईक हेदेखील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. आज संदीप नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत बैठक पार पडली या बैठकीत सर्व नगरसेवकांनी गणेश नाईक यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची गळ घातली. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतारही यावेळी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेते-कार्यकर्त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून नवी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं भाजपमध्ये होणारं पक्षांतर वरकरणी स्थानिक वाटत असलं, तरी यामागे विधानसभा निवडणुकीची गणितं असल्याचे दिसत आहे.

आरोग्यविषयक वृत्त