MLA Sanjay Gaikwad | संजय गायकवाडांकडून युवकाला केलेल्या मारहाणीचे समर्थन, म्हणाले – ‘ती तर भूषणावह बाब’

बुलढाणा : MLA Sanjay Gaikwad | शिवजयंती मिरवणुकीत बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे एका तरुणाला लाठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गायकवाड हे अतिशय निर्दयीपणे पोलिसाच्या काठीने मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आता यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या मारहाणीचे समर्थन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केले.(MLA Sanjay Gaikwad)

शिवजयंतीच्या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड यांनी एका तरुणाला अंगरक्षक पोलिसाच्या लाठीने बेदम मारहाण केली होती. या मिरवणुकीत, सर्वप्रथम काही तरुणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. नंतर पोलिसाने युवकाला काठीने मारहाण केली.

मग आमदार संजय गायकवाड यांनी देखील पोलिसाची काठी घेऊन त्या युवकाला अतिशय निर्दयीपणे बेदम मारहाण केली. तब्बल १० दिवसानंतर आता या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यासंबंधीची वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाल्यानंतर आज संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन यूवकाला केलेल्या मारहाणीचे समर्थन केले आहे.

संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय गायकवाड यांनी म्हटले की, शिवजयंती मिरवणुकीत मी त्या युवकाला केलेल्या मारहाणीचा, मला अजिबात पश्चाताप नाही. उलट ती भूषणावह बाब आहे. बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीत माता भगिनीवर चाकूने हल्ले करणारे एक टोळके कार्यरत आहे. यंदाच्या मिरवणुकीपूर्वी आपण पोलिसांना याची कल्पना दिली होती.

मात्र, पोलिसांना मिरवणुकीत ते गवसले नाही. जयस्तंभ चौकात एक महिला व तिच्या मुलीने याची मला माहिती दिली.
ते चाकूने हल्ला करण्याचा बेतात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली.
त्यातील एकाने माझे अंगरक्षक योगेश मुळे यांना खाली पाडले.

त्यामुळे मी त्यांच्या हातातील लाठी घेऊन त्या युवकाला मारहाण केली.
माताबहिणीच्या रक्षणासाठी केलेली ती कृती होती, नव्हे तर जयंती समिती अध्यक्ष व आमदार म्हणून ते माझे कर्तव्यच होते.
यामुळे उपद्रवी युवकास केलेल्या मारहाणीचा मला अजिबात पश्चाताप नसून उलट माझ्यासाठी ती भूषणावह बाब आहे.
यापुढेही कोणी सार्वजनिक कार्यक्रमात असा उपद्रव केला तर मी अशी कारवाई करणारच, असे समर्थन गायकवाड यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonikand Crime | पुणे : सासरी येण्यास नकार दिल्याने पत्नीवर वार, पतीला अटक

Pramod Nana Bhangire | ‘अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना निधी न आणणाऱ्या विरोधकांनी श्रेय लाटू नये’ ! ‘विकास कामात अडथळा आणल्यास करारा जवाब मिलेगा’ – प्रमोद नाना भानगिरे

Pune Cheating Fraud Case | बनावट सह्यांच्या आधारे भागीदाराकडून सव्वापाच कोटींची फसवणूक ! न्यायालयाने जामीन फेटाळूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा पीडित माणिक बिर्ला यांचा पत्रकार परिषदेत आरोप