MLA Sanjay Gaikwad | शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर आस्मानी संकट, आमदार संजय गायकवाडांनी घेतला मोठा निर्णय

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक (Rain in Maharashtra) वाहून गेले. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या आस्मानी संकटाची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी केली. तत्पूर्वी, शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी शेतकऱ्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी दिवाळी (Diwali Festival) साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उद्या पहिल्या अंघोळीच्यादिवशी चटणी-भाकरी खाऊन दिवाळी साजरी करणार असल्याची घोषणा संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केली आहे. यासाठी जिल्हाधीकारी कार्यालयासमोर ही कृती करुन एक संदेश देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी सांगितले की, बळीराजावर ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे आपणही यंदाची दिवाळी साजरी करणार नाही, अशी भूमिका गायकवाड यांनी घतेली आहे. तसेच मी कुठलाही निषेध नोंदवणार नाही, कुठलीही घोषणाबाजी करणार नाही. त्यामुळे हे सरकारविरोधात आंदोलन नाही. केवळ, समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तसेच यामागे कोणतेही राजकारण नाही असेही त्यांनी म्हटले.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर डोंगराएवढे संकट उभे आहे. हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
सगळ्यांची दिवाळी उत्साहाने साजरी होत असताना शेतकऱ्यांची दिवाळी मात्र संकटाने साजरी होत आहे.
मागील दोन वर्षात कोरोना संक्रमणामुळे (Corona Infection) दिवाळीवर संकट होते.
यंदा वातावरण निवळल्याने दिवाळी उत्साहात साजरी होईल असे वाटले होते. परंतु परतीच्या पावसाने हे स्वप्न देखील धुळीस मिळाले.
सातत्याने तीन वर्ष शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत नसल्याने ही भूमिका घेतल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले.
तसेच दीपवलीच्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचा दिवा लावणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.

 

Web Title :- MLA Sanjay Gaikwad | we will eat chutney bread on diwali for farmer says mla sanjay gaikwad of shinde group in buldhana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | सोनं दुप्पट करून देण्याच्या आमिषाने पथारी व्यावसायिक महिलेला भरदिवसा गंडा, फडके हौद परिसरातील घटना

Uddhav Thackeray | धीर सोडू नका, मदतीसाठी सरकारला भाग पाडू; बळीराजाने उद्धव ठाकरेंच्या हाती दिला ‘आसूड’

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले – ‘वेळ आली आणि राज ठाकरे यांनी…’