नीरा येथील मुस्लिम बांधवांना ईद निमित्त आ. संजय जगताप यांच्या वतीने 320 लिटर दुधाचे वाटप

नीरा – कोरोनाच्या विळख्यात देशासह राज्यातील सर्वसामान्य जनता अडकल्याने हवालदिल झाली आहे. या दरम्यान मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे रोजे व रमजान ईद आली आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना साधेपणाने का होईना ईद साजरी करता यावी याकरिता नीरा (ता.पुरंदर) येथील मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या निमित्ताने पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या वतीने ३२० लिटर दुध व नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे यांच्या वतीने ३०० कुटुंबांना प्रत्येकी दोन किलो साखर व शेवईच्या पुड्याचे रविवारी ( दि.२४) वाटप करण्यात आले.

या वेळी माजी सरपंच राजेश काकडे, चंदरराव धायगुडे, पुणे जिल्हा गटसचिव संघटनेचे जनरल सेक्रेटरी रफीक शेख , पुरंदर तालुका अल्पसंख्यांंक सेलचे अध्यक्ष मोबीन बागवान , माजी उपसरपंच दिपक काकडे, हरिभाऊ जेधे, कल्याण जेधे, संदेश गायकवाड, सतिश पवार, सिकंदर शेख, जावेद शेख, फिरोज सय्यद, नदीम सय्यद आदी उपस्थित होते.

यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने जावेद शेख व सिकंदर शेख यांनी आ.संजय जगताप व मिजी सरपंच राजेश काकडे यांचे आभार मानले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like