MLA Sanjay Shirsat | आमदार संजय शिरसाट भडकले; म्हणाले – ‘जशास तसे उत्तर देणार, आमदारकी गेली उडत’

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sanjay Shirsat | तो संज्या तुझं वय काय माझं काय, वडिलांना काय हाक मारता. आम्हाला वरातीचे घोडे बोलतात, मी जर बोललो की महिलांचा अपमान केला आणि तुम्ही सगळ्यांची उधळत बसायचं हे चालणार नाही. तुम्हाला लढायचं तर समोर या, माझ्या बद्दल मी काहीही खपवून घेणार नाही, जशास तसे उत्तर देणार, गेली उडत ती आमदारकी, असं म्हणत आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) कमालीचे भडकले. सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी तक्रार केल्यानंतर संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

तर राजीनामा देईन

गेल्या आठवड्यात माझ्याकडे शिवसेनेचा एक मेळवा (Shivsena Melava) आयोजित करण्यात आला होता. त्यात माझं ते वक्तव्य होतं. या ज्या सुषमा अंधारे आहेत त्या चावी दिल्यासारख्या बोलत आहेत. माझा भाऊ माझा भाऊ बोलत आमच्यावर जी टीका करत आहेत त्या माफ करायच्या का? जो व्हिडिओ माझा फिरतोय त्यात मी काय अश्लील बोललो असेल तर आमदारकीचा तातडीने राजीनामा (Resignation) देईन, असं आव्हान संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी यावेळी दिले.

महिला आहे तर महिलेसारखं बोलावं

महिलेचा अपमान झाला असल्याचे म्हटले जात आहे. पण जर महिला आहे तर महिलेसारखं बोललं पाहिजे. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना शिव्या दिल्या, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना शिव्या दिल्या. आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन अशा प्रकारे शिव्या देण्याचं कंत्राट यांना कोणी दिले आहे. महिला म्हणून आम्ही काहीच बोलायच नाही, पण त्याचा बाऊ करण्यात आला. यांची पार्श्वभूमी पाहीली तर त्यांनी आत्तापर्यंत काय-काय बोलले याचे रेकॉर्डिंग आहे. याच सुषमा अंधारे या हिंदू देवतांना बद्दल काय बोलल्या, मराठा समाजा बद्दल काय बोलल्या, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल काय बोलल्या, त्यांना हा अधिकार कोणी दिला, असेही शिरसाट म्हणाले.

आमदारकी गेली उडत…

महिला आयोगात (Women’s Commission) त्यांनी जायलाच हवं मी नोटीस आली की नक्की उत्तर देईन आणि चौकशीला ही जाईन. आज मातोश्रीवरुन फोन गेला माझ्या विरोधात आंदोलन करण्यासाठी… तेव्हा त्या महिला आंदोलनासाठी आल्या. पण राजकारणात समोरा समोर लढलं पाहिजे. तुम्हाला लढायचं तर समोर या, माझ्याबद्दल मी काहीही खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर देणार असून, गेली उडत ती आमदारकी अशा शब्दात शिरसाट यांनी आपल्यावरील आरोपाला उत्तर दिले.

मुंबईत फ्लॅट घेतल्याचा बाऊ केला

मुंबईत 72 व्या मजल्यावर कुणालासाठी फ्लॅट घेतला आहे, असा सवाल रूपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे. यावर बोलताना, कोण रुपाली पाटील? (Rupali Patil) मला माहिती नाही. ना तिला कधी आयुष्यात पाहिलं आहे किंवा तिची माझ्याशी भेट झाली आहे. मुंबईत मी कुठ राहयला हवं, रस्त्यावर… फ्लॅट कसा घेतला याची चौकशी करा.
दोन घरे घेतले त्या म्हणतात, तर ते तुमच्या नावावर करु घ्या.
मुंबईत एवढे फ्लॅट आहेत त्यातला एक फ्लॅट घेतल्याचा बाऊ केला.
असल्य निघालं तर बघा मग, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.
काही महिलांना वाटतं स्वातंत्र्य फक्त दोन-तीन जणींना दिलं आहे, हा स्टंटबाजीचा प्रकार आहे,
असा टोला त्यांनी लगावला. तसेच शीतल म्हात्रेविषयी (Sheetal Mhatre)
जेव्हा काल खालच्या भाषेत बोलण्यात आलं तेव्हा काय वाचा बसली होती का?
असा सवालही शिरसाट यांनी केला.

Web Title :- MLA Sanjay Shirsat | not-a-single-wrong-word-was-spoken-
about-sushma-andhare-disclosure-of-mla-sanjay-shirsat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On President Rule In Maharashtra | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका नाही तर
राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता, जयंत पाटील यांचा दावा

Incredible Samaj Sevak Group – Pune PMC News | दहनभूमी,दफनभूमीतील खर्चाबाबत पुणे महानगरपालिकेकडे नाहीत उत्तरे ! इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपकडून चौकशीची मागणी

Dagdusheth Ganpati Pune News | ‘परंपरा’ मधून पुणेकरांनी अनुभवला व्हायोलिनचा सुरेल
अविष्कार ! व्हायोलिन वादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर यांचे सादरीकरण