MLA Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर थेट टिका, म्हणाले – ”नालायकांनो आपला पक्ष सांभाळा, आता त्याच पद्धतीनं उत्तर देऊ”

मुंबई : MLA Sanjay Shirsat | जो माणूस स्वत:च्या घराची काळजी न करता बेपर्वाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जात असेल तर असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे. अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा किंवा मी राज्याचा महत्त्वाचा भाग आहे हे बोलण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी काल केले होते. यावर शिंदे गटाकडून (Shinde Group) संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी यावरून थेट उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे.

संजय शिरसाट म्हणाले, काल ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्याने मुख्यमंत्र्यांसंदर्भात अपशब्द वापरले. ते म्हणतात त्या शब्दाला शिवी म्हणत नाहीत. आम्हाला नालायक म्हणत आहे. आम्ही काय केले? शेतकऱ्यांना दिलासा दिला म्हणून नालायक, शिवसेना प्रमुखांच्या नावाने दवाखाने काढले म्हणून नालायक, मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तडीस नेत आहोत म्हणून आम्ही नालायक, ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लावता आम्ही हे सर्व करत आहोत म्हणून आम्ही नालायक आहोत, आम्ही सर्वसामान्य जनतेत फिरत आहोत म्हणून आम्ही नालायक, तर आहोत आम्ही नालायक. आम्ही घरात बसलेलो नाही. आम्ही कधी घरात बसून टोमने मारलेले नाही.

संजय शिरसाट म्हणाले, नालायक शब्दासंदर्भात जे स्पष्टिकरण दिलं जातंय, त्या नालायकांना मला सांगायचे आहे, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, पण शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करणारे नालायक आहात. कारण नालायक शब्द चांगला आहे. तुम्हाला तो आवडतो, म्हणून मी तो वापरत आहे. नालायकांनो ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदूत्वासाठी हायात घालवली, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) युती करू नये, असे ज्यांचे मत होते. त्यांचे मत डावलून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली.

शिरसाट म्हणाले, नालायकांनो हे पाप फेडावे लागणार. जनता तुम्हाला लायकी दाखवणार आहे.
खरे तर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यांना नालायक ठरवणाऱ्या लोकांना हे मांडीवर घेऊन बसू लागले आहेत.
म्हणून यांच्या तोंडात असे शब्द येत आहेत. जे यांना शिव्या देत होते. जे यांची टिंगल टवाळी करत होते,
अशा लोकांच्या सहवासात असल्याने यांच्या तोंडात असे शब्द येत आहेत.

संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) म्हणाले, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सर्वसामान्यांचे नेते झाल्याचे दुःख तुम्हाला होत आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुढे चालले आहेत, याचे दुःख होत आहे. एकनाथ शिंदे आता सर्वसामान्यांना मान्य असलेले नेतृत्व होत आहेत, ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही बसा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर. नालायकांना दुसरे काय सुचणार? हीच तुमची लायकी आहे ना?

संजय शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्री तेलंगाणामध्ये गेले, तर एकीकडे त्यांच्यावर टीका करत आहेत, तर दुसरीकडे
म्हणतात राष्ट्रवादीला का घेऊन गेले नाही? अरे बाबा तुम्हाला काय करायचं आहे? नालायकांनो आपला पक्ष सांभाळा
ना. मी पहिल्यांदाच असं यासाठी बोलतोय की, आता तुमची लिमिट संपली आहे.

शिरसाट पुढे म्हणाले, आता जर तुम्ही वाकडे बोलायला सुरुवात कराल, तर त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल.
स्वतःला काय समजता? शिवसेना प्रमुख समजता. आमचे दैवत आहे ते. कुणीतरी एका ठिकाणी हिंदुहृदय सम्राट लिहिले.
तर तुम्ही टीका करायला सुरुवात केली. शिवसैनिक बाळासाहेबांच्या चरणी लीन होण्यासाठी जात असताना दगडफेक
करता तुम्ही. त्यांना गचांड्या देता तुम्ही. नालायकांनो तुम्हाला हे पाप फेडावे लागणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | एसटी बस चालकाला शिवीगाळ करुन मारहाण, रिक्षाचालकाला अटक; लोणी काळभोर येथील घटना

Gold-Silver Rate Today | सोन्याचा नवा विक्रम! चांदी देखील महागली, जाणून घ्या आजचे दर

Maharashtra MLA Disqualification Hearing | ३१ डिसेंबरपर्यंत आमदार आपत्रता निर्णय अशक्य, सुप्रीम कोर्टाकडे राहुल नार्वेकर मुदतवाढ मागणार?