MLA Sanjay Shirsat | मानहानी खटल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट यांना पुणे कोर्टाचे समन्स

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sanjay Shirsat | शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने (Pune Shivajinagar District and Sessions Court) समन्स (Summons) जारी केला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दाखल केलेल्या तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याप्रकरणी (Defamation Suit) शिरसाट यांना हे समन्स बजावण्यात आले. दिवाणी न्यायाधीश (Civil Judge) यांनी आमदार शिरसाट यांच्याविरोधात समन्स बजावले आहे. दि. 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहून दाव्याला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी अंधारे यांनी पुणे पोलिसांकडे (Pune Police) केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर शिरसाट यांनी केलेल्या कथित वक्तव्याबाबत अंधारे यांनी त्यांना मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये, त्यांनी 7 दिवसात खुलासा करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने अंधारे यांनी शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला होता. दिवाणी दाव्यात त्यांनी तीन रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असे नमूद केले होते. त्यानंतर न्यायालयाने शिरसाट यांना समन्स बजावले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून
(Chhatrapati Sambhajinagar Police) मोठा दिलासा मिळाला होता.
अंधारे यांच्याविरुद्ध विनयभंग करणारे वक्तव्य केल्या प्रकरणाच्या आरोपाबाबत शिरसाट यांना पोलिसांकडून
क्लीन चीट देण्यात आली. डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर शिरसाट यांना ही क्लीन चीट मिळाली आहे.

Web Title :  MLA Sanjay Shirsat | pune shivaji nagar court summons sanjay shirsat orders him to appear in court on july 13 in defamation case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांसाठी दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचा दर

Maharashtra Monsoon Update | पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; मुंबई, ठाणेसह कोकणातही बरसणार सरी