MLA Sanjay Shirsat | लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…, संजय शिरसाट यांचा संजय राऊतांबाबत खळबळजनक दावा

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) सतत शिंदे गट आणि भाजपवर (BJP) टीका करत असतात. काल संजय राऊत यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्यावर प्रश्न विचारलाला असता त्यांनी उत्तर न देता थुंकले. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा वागण्याचे कारण म्हणजे, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांचे कोणाशीच जमत नाही, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी केली. तसेच अशी लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल आहे, माझ्याकडे याचा व्हिडिओ आहे, असा खळबळजनक दावा शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी केला.

 

संजय राऊत यांनी केलेल्या कृतीवरुन शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यांकडून तीव्र पडसाद उमटले आहेत. याबाबत संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना पत्रकारांनी विचारले अससता ते म्हणाले, राऊत यांनी केलेल्या एका आंदोलनाचा फोटो दाखवा, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा गट संपवण्याचे कंत्राट राऊत यांनी घेतले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळते, त्यांना योग्य वेळी उत्तर दिले आहे. प्रसिद्धी मिळवणे हाच यांचा धंदा आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला.

 

शिरसाट पुढे म्हणाले, नाशिकच्या शिवसैनिकांना विचारा यांनी काय गोंधळ घातला. एका महिलेला यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
त्या महिलेपासून राऊत यांना एक मुल आहे. याचा व्हिडिओ लवकरच बाहेर येईल, अशी लायकी नसलेली माणसे राजकारणात आहेत, अशी घणाघाती टीका संजय शिरसाट यांनी केली.

Advt.

संजय राऊतांनी नेमका काय पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) केला आहे, हे मी जनतेसमोर आणणार आहे.
या प्रकरणाचा तपास होऊन लवकरच संजय राऊत पुन्हा तुरुंगात जातील असा दावा संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

 

Web Title :  MLA Sanjay Shirsat | sanjay raut has a child from a woman sanjay shirsats sensational allegation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा