MLA Sanjay Shirsat | सुषमा अंधारे मारहाण प्रकरणावर संजय शिरसाटांची उपरोधक टीका, म्हणाले- ‘त्या पैसे घेऊन काम करणाऱ्या…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना बीडचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी कथित मारहाण केल्याची घटना समोर (Sushma Andhare Beating Case) आली आहे. जाधव यांनी स्वत: एक व्हिडिओ शेअर करुन याची माहिती दिली आहे. यानंतर भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया देताना उपरोधक टीका केली आहे. एवढ्या मोठ्या अॅक्टरला मारहाण झाल्याचं ऐकून दु:ख झालं. त्या एक महान कलाकार आहेत. पैसे घेऊन काम करणाऱ्या नेत्या आहेत, असा टोला शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी लगावला आहे.

याचा अर्थ आता मर्यादा संपली

आप्पासाहेब जाधवांचा व्हिडिओ माझ्याकडे आला आहे. तो मी पाहिला. संबंधित व्हिडिओत त्यांनी आरोप केला की, या बाईने एसी, फर्निचरसाठी पैसे मागितले. एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या महिलेवर हात उचलण्यापर्यंत मजल जाते, याचा अर्थ आता मर्यादा संपली आहे. त्या बाई असं काहीतरी बोलल्या असतील, ज्यामुळे त्यांनी जे होईल त्या परिणामांना तोंड देईल, या मानसिकतेतून तो व्हिडिओ शेअर केला आहे, असं संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) म्हणाले.

त्यामुळे निष्ठेचं काहीही मूल्य नाही

शिरसाट पुढे म्हणाले, त्या बिचाऱ्याला हे माहिती नाही की, या सुषमा अंधारेंनी बाळासाहेब ठाकरे
(Balasaheb Thackeray) यांना म्हातारड्या म्हटलं होतं. त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची
वाट लावली. आदित्यला (Aaditya Thackeray) बोकांडी घे आणि ‘लुंगी डान्स’ कर असंही म्हणाल्या होत्या.
अशा व्यक्तीला उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं. त्यामुळे तुझ्या निष्ठेचं काहीही मूल्य नाही.

महिलेनं मर्यादा ओलांडू नये

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या निष्ठेला महत्व दिलं होतं. महिलेवर हात उगारु नये, या मताचा मी आहे.
मात्र महिलेनं मर्यादा ओलांडू नये. मुख्य म्हणजे हा प्रकार जिल्हा प्रमुखांकडून घडला आहे,
इतर कुणाकडून घडला असता तर आपण दुर्लक्ष केलं असतं. उद्धव ठाकरे यांनी आतातरी डोळे उघडून पहिलं पाहिजे.
नाहीतर संजय राऊत (Sanjay Raut) आणि सुषमा अंधारे ही जोडी त्यांना बुडवल्याशिवाय राहणार नाही,
असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.

Web Title :  MLA Sanjay Shirsat | sanjay shirsat reaction on sushma andhare beating aappasaheb jadhav viral video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

DPDC Meeting Pune | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा ! जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना राबविणार-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Maharashtra Politics News | ‘…तर बावनकुळेंनी बारामतीमधून अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवावी’, राष्ट्रवादीच्या आमदाराचं खुलं आव्हान

Pune Crime News | सोलापूरचे तोतया पत्रकार हनमे बंधूंनी बडया बिल्डरकडे देखील मागितली होती खंडणी; 50 लाख अन् 2 फ्लॅटची होती डिमांड, जाणून घ्या प्रकरण