MLA Sanjay Shirsat | विनायक राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय शिरसाटांचा पलटवार, म्हणाले-‘त्यांच्याकडे…’

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP)-शिंदे गटाने (Shinde Group) कंबर कसली आहे. यासाठी दोन्ही कडून आढावा बैठक आणि दौरे सुरु करण्यात आले आहेत. याचदरम्यान ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी शिंदे गटातील 22 आमदार आणि आणि 9 खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्याकडे चिन्ह, पक्ष आणि सत्ता नाही, मग लोक त्यांच्याकडे कशाला जातील, असा टोला शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी राऊतांना लगावला.

 

एका वृत्तवाहीनीशी बोलताना संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) म्हणाले, खोट बोलायचं, पण रेटून बोलायचं काम केलं जात आहे. त्यांच्याकडे चिन्ह, पक्ष आणि सत्ता नाही, मग लोक त्यांच्याकडे कशाला जातील. अपात्र होणारे आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडे जाऊन मला अपात्र व्हायचं आहे का? पण, आमदारांना थांबवण्यासाठी वावड्या उठवल्या जात आहेत, असं शिरसाट म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधताना शिरसाट म्हणाले, ठाकरे गटाचे प्रमुख संजय राऊत आहेत. यांच्या कृती सर्वसामान्य
शिवसैनिकाला (Shiv Sainik) आवडत नाहीत. कधी नव्हे ते ‘मातोश्री’ शरद पवारांच्या (Sharad Pawar) ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर जात आहे.
हे चित्र शिवसैनिकांनी कधीच पाहिलं नाही. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणायचे, ‘ज्यांचं पोट पाठिला चिटकलेलं आहे,
तोच शिवसैनिक…’ आता चित्र उलटं झाल आहे. ‘ज्यांच्या अंगावर कोट आणि हातात मेकअपचा डबा तो शिवसैनिक’,
असा टोला संजय शिरसाट यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना नाव न घेता लगावला.

 

 

Advt.

Web Title :  MLA Sanjay Shirsat | sanjay shirsat reply 22 mla and 13 mp touched thackeray group vinayak raut statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा