MLA Sanjay Shirsat | अंबादास दानवे शिवसेनेत प्रवेश करणार?, संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी शिवसेना मेळाव्यात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) आपल्या संपर्कात असून कधीही काही होऊ शकतं. अंबादास दानवे यांचा मला कॉल आल्याचा दावा संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी केला आहे. शिरसाट यांच्या दाव्यामुळे राजकीय (Maharashtra Politics News) चर्चांना उधाण आले आहे.

 

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) बोलत होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते अंबादास दानवे आपल्या संपर्कात असून त्यांचा मला कॉल आला होता. केव्हाही काही होऊ शकतं असा दावा त्यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. आमच्या मागे गर्दी होत नाही तर मग इथे इतके लोक कसे जमले. उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा निषेध केला नाही, अशी टीका शिरसाट यांनी केली.

 

https://www.facebook.com/photo/?fbid=767169191433803&set=a.260724075411653

उर्दू बॅनर्सवरुन वाद शिगेला
मालेगावात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर उर्दूतील बॅनर लावण्यात आले आहे. यावरून शिंदे गट आणि भाजपने (BJP) उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. या टीकेला अंबादास दानवे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे फोटो पोस्ट करुन प्रत्युत्तर दिले आहे.

 

https://www.facebook.com/photo?fbid=767166511434071&set=a.260724075411653

 

अंबादास दानवे यांनी फेसबुकवर फडणवीसांचा एक फोटो पोस्ट केला आहे.
यात फडणवीस मुस्लीम बांधवांच्या कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत. या फोटोला दानवे
यांनी ‘जिनके घर शीशे के बने होते है वो दूसरों पर पत्थर नहीं फेंकते..’ असे कॅप्शन दिले आहे.
तर एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करुन ‘जनाब एकनाथ शिंदे ये भी देख लो….नंतर उध्दवसाहेबांवर टीका करा,
कारण तुमची तेवढी पात्रता नाही’ अशी घणाघाती टीका केली आहे.

 

Web Title :- MLA Sanjay Shirsat | shinde group claims that ambadas danve will join shivsena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश