MLA Sanjay Shirsat | सामनातील टीकेवरुन संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले- ‘स्वत: खुडूक आणि कोंबड्याही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray Group) मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे गटावर (Shinde Group) टीका करण्यात आली आहे. मंधे गटाच्या 40 कोंबड्या महाराष्ट्रात आणि 13 तुर्रेबाज कोंबडे भाजपच्या (BJP) खुराड्यात बंदीवान आहेत. त्यांच्या मानेवर कधी सुऱ्या फिरतील सांगता येत नाही, अशी टीका करण्यात आली आहे. या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘सिल्व्हर ओक’वर (Silver Oak) मुजरा घालणारे लोक तुम्ही पाहिले आहेत. त्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) यांचा समावेश आहे, असा टोला संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी लगावला.
संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) म्हणाले, सामनात आता लिहिण्यासारखं काही राहिलं नाही. स्वत:च्या लाचारीची लत्करे वेशीवर टांगू शकत नाहीत. कारण, मागील काही दिवसांत सिल्व्हर ओकवर मुजरा घालणारे लोक (Maharashtra Politics News) तुम्ही पाहिले आहेत. त्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा समावेश आहे. पण, त्यांना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीवाले (NCP) सुद्धा विचारत नाहीत. आम्हाला पाठिंबा द्या, असं म्हणायला सुद्धा कोणी जात नाही, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
स्वत: खुडूक आणि कोंबड्याही खुडूक
शिरसाट पुढे म्हणाले, मातोश्रीचं वजन घालवणारे हे लोक आम्हाला कोंबड्या म्हणत आहेत. दुसऱ्या पक्षाच्या खुडूक कोंबड्या यांच्या पक्षात घेत आहेत. स्वत: खुडूक आणि कोंबड्याही खुडूक आहेत, असा टोमणा त्यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावला.
आधी दाणा, मग कापती माना
‘आधी दाणा, मग कापती माना’ असेही सामनात म्हटले आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले,
आता दाणा टाकतील की पंचपक्वानाचं ताट देतील, याची चिंता करण्याची गरज नाही.
आमच्या माना राहतील की जातील याचीही चिंता करु नये. फक्त तुम्ही मुजरे घालत आहात,
त्यामुळे कंबरदुखी होईल याची काळजी घ्या, असा खोचक टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.
Web Title : MLA Sanjay Shirsat | shinde group mla sanjay shirsat reply thackeray group saamana editorial
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा