मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics News) कोणत्या ना कोणत्या मुद्यावरुन तापत आहे. खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) सतत शिंदे गटावर (Shinde Group) टीका करतात. त्यांच्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जाते. राऊतांनी शिंदे गट म्हणजे भाजपने (BJP) पाळलेला कोंबड्यांचा खुराडा असल्याची टीका केली आहे. या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर देताना जहरी टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा (Prem Chopra) आहे. त्याला रोज काही ना काही बडबड करण्याची सवय असल्याचे संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) म्हणाले.
काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे. त्याला रोज काही ना काही बडबड करुन कुणालाही नांदू द्यायचं नाही असा त्याचा चंग असतो. खरंतर त्याने आज जे स्टेटमेंट केलंय आम्हाला कोंबड्यांचा खुराडा वगैरे जे म्हणाला आहे, त्याने रमजानमध्ये शीरखुर्मा जास्त खाल्ल्याने त्याच्यावर कापायचा प्रभाव पडला आहे. ज्याची नसबंदी (Sterilization) झालेली असते त्याला मुलं होत नाही म्हणतात. पण संजय राऊत हा असा चमत्कार आहे जो नसबंदी झाल्यावरही आम्हाला मुलं होतील असं सांगत आहे, अशा शब्दात संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं.
तसेच 18 खासदारांपैकी 13 खासदार निघून गेले आहेत. पाच खासदार राहिले आहेत. तरीही 19 खासदार निवडून येतील हा दावा करणं मुर्खपणा संजय राऊत करतो आहे. त्यामुळेच हा पक्षही लयास गेला आहे, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, तुम्ही जो काय शिंदे-मिंधे गट म्हणत आहात त्यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहतच नाही.
भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा तो खुराडा आहे.
गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात, कधीही कुठल्याही कोंबड्या कापल्या जातील. हे लक्षात घ्या.
तो पक्ष नाहीच, कोंबड्या कॉक कॉक आरवत असतात. तसं ते बोलतात, पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय बैठक आहे?
काय विचारधारा आहे? निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्ह विकत दिलं म्हणजे
तो पक्ष ठरत नाही.
Web Title : MLA Sanjay Shirsat | shivsena spokeperson sanjay shirsat slams sanjay raut on his comment
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Traffic Police | नो पार्किंगला गाडी लावताय तर सावधान; वाहतूक पोलिसांकडून बसेल मोठा भुर्दंड