MLA Sanjay Shirsat | सुषमा अंधारेंच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली दखल, पोलीस आयुक्तांना दिले कारवाई करण्याचे निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sanjay Shirsat | ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणारे शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे (State Commission for Women) तक्रार दाखल केली आहे. तसेच महिला आयोगाना संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अंधारे यांनी केली होती. महिला आयोगाने (State Commission for Women) अंधारे यांच्या तक्रारीची दखल घेतली असून याप्रकरणी योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar CP) यांना दिले आहेत. तसेच 48 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता (CP Dr. Nikhil Gupta) यांना पत्र पाठवून लोकप्रतिनिधींनी अशी अश्लिल भाषा वापरणे अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा अवमान करण्याचे प्रकार वाढल्याबद्दल चिंता व्यक्त करुन चाकणकर यांनी या प्रकरणात तातडीने कार्यवाही करुन राज्य महिला आयोग कायदा (State Commission for Women Act) 1993 कलम 12 (2) आणि 12 (3) नुसार 48 तासांत अहवाल कार्यालयास पाठवण्यात यावा असे निर्देश दिले आहेत.

काय म्हणाले संजय शिरसाट?

संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी शिवसेना मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मात्र, यावेळी शिरसाट यांचा तोल गेला आणि त्यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले होते की, ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत.., असं वक्तव्य शिरसाट यांनी केले होते.

Web Title :- MLA Sanjay Shirsat | take-action-against-the-sanjay-shirsat-who-talks-so-much-about-women-womens-commission-directive-to-police-commissioner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | व्यावसायिकाकडून 12 लाख घेतल्याचा आरोप ! सहाय्यक पोलीस आयुक्त घनवट, पोलीस अंमलदार विजय शिर्केविरूध्द खंडणीचा गुन्हा

Trade Finance Cooperation | “सर्व देशांनी, कागदविरहित आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आवश्यक ते कायदे आणण्याचा प्रयत्न करावा”

Sanjay Naval Koli Death | कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन