MLA Satish Chavan | शिक्षणशास्त्र विषय विद्यार्थ्यांनी अभ्यासावा- आमदार सतीश चव्हाण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षणशास्त्र हा विषय ग्रुप ‘सी’ मधून काढून ग्रुप ‘बी’ मध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणशास्त्र परिषदेच्या (Maharashtra State Junior College Education Council) वतीने आमदार सतीश चव्हाण (MLA Satish Chavan) यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी आमदार सतीश चव्हाण (MLA Satish Chavan) यांनी याविषयाचा आपण पाठपुरवा करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

 

आमदार सतीष चव्हाण (MLA Satish Chavan) यांना निवेदन देताना परिषदेचे प्रा. रामकीशन मोगल, डॉ. धनंजय खेबडे, प्रा. सिद्धार्थ कुलकर्णी, प्रा. प्रल्हाद गायकवाड, प्रा. संजीवकुमार सुर्वे, प्रा. कर्तीराज लोणारे, प्रा. ज्ञानेश्वर उबाळे, प्रा. निलकंठ हजारे आदी उपस्थित होते.

 

राज्यात उच्च माध्यमिक स्तरावर (State Higher Secondary Level) 8 ऑगस्ट 2019 च्या सुधारित विषय व मूल्यमापन योजनेनुसार पूर्वीच्या विषय रचनेत बदल करण्यात आला आहे. पूर्वी ऐच्छिक असणारा शिक्षणशास्त्र हा विषय ग्रुप ‘सी’ मध्ये समाविष्ट केला आहे. नवीन विषय रचनेनुसार ग्रुप ‘सी’ मध्ये एकूण 18 विषय आहे. यातील केवळ एक विषय निवडण्याची किंवा नाही निवडला तरी चालेल, अशी विषय रचना करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणशास्त्र विषय निवडता येत नाही. त्यामुळे या विषयाचा समावेश ग्रुप ‘बी’ मध्ये करावा अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

Web Title :- MLA Satish Chavan | Students should study pedagogy – MLA Satish Chavan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Beed Crime | धक्कादायक ! शाळेतच शिक्षिकेचा विषारी द्रव्य पिवून आत्महत्येचा प्रयत्न; मुख्याध्यापकासोबत वाद?

Nagaland Firing News | नागालँडमध्ये दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात 11 लोकांचा मृत्यू; परिसरात तणावपूर्ण वातावरण

Pune Crime | जादुटोणाचा आरोप करून पोलिसांकडे तक्रारीची धमकी; पुजार्‍याला लुबाडणार्‍या दोघांना अटक; महिलेसह 3 जणांवर खंडणीचा गुन्हा

Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन दोघा चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले; पुण्यातील पाषाण परिसरातील घटना

Pune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा धाक दाखवून चालकाला लुबाडले