MLA Shahajibapu Patil | ‘शिंदे गट म्हणजे भाजपनं पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा’ संजय राऊतांच्या टीकेला शहाजीबापूंचे प्रत्युत्तर; म्हणाले- ‘बिन बुडाचं अडगं कुणीकडही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) शिंदे गटावर (Shinde Group) सतत टीका करत असतात. शिंदे गटाकडे मी पक्ष म्हणून पाहत नाही. शिंदे गट भाजपने (BJP) पाळलेल्या कोंबड्याचा खुराडा आहे, या कोंबड्या कधीही कापल्या जातील, असं राऊत म्हणाले होते. राऊतांच्या टीकेचा शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत हे एका बारक्या खुराड्यात बसले आहेत, असा पलटवार शहाजीबापू (MLA Shahajibapu Patil) यांनी केला आहे.

शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) म्हणाले, संजय राऊत हे एका बारक्या खुराड्यात बसले आहेत. आमचा पक्ष आहे, हे निवडणूक आयोगाने जाहीररित्या देशाला सांगितलं आहे. बिन बुडाचं अडगं कुणीकडही घरंगळत महाराष्ट्रात हिंडतंय, ओरडतंय आणि आरडतंय, याला काहीही अर्थ नाही, अशा शब्दात त्यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला.

शहाजीबापूंचा राऊतांना सल्ला

यावेळी शहाजीबापूंनी संजय राऊतांना सल्ला दिला. ते म्हणाले, संजय राऊतांसारखी माणसं देशाची स्वायत्ता, लोकशाही आणि लोकांचा स्वातंत्र्यावर असलेला विश्वास डळमळीत करण्याचं काम करत आहेत. राऊतांची भूमिका सकाळी टीव्हीसमोर 15 मिनिट सेडून कोणतीच नाही. त्यांनी राजकारणावर भाष्य करु नये, असा सल्ला पाटील यांनी राऊतांना दिला.

‘माकडाच्या हातात कोलीत-संजय राऊत’

महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यावर ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ असा चित्रपट काढणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितलं.
यावर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, खोके-खोके म्हणत संजय राऊत दगडे मारत फिरणार आहेत.
त्यांना कावीळ झाली आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संजय राऊतांसारख्या माणसाच्या हातात कोलीत दिलं आहे.
ते महाराष्ट्रात भांडण लावत फिरत आहेत. त्यामुळे ‘माकडाच्या हातात कोलीत-संजय राऊत’ असा चित्रपट
तुम्हाला दिसेल, असेही शहाजीबापू पाटलांनी सांगितलं.

Web Title : MLA Shahajibapu Patil | sangola mla shahajibapu patil reply sanjay raut over shinde group bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘लोकसभेच्या ‘त्या’ 22 जागा आमच्याच’, कीर्तिकरांच्या दाव्यावर भाजपची प्रतिक्रिया

Pune Pimpri Chinchwad Crime News | सीएम ऑफिसमधील अधिकारी असल्याचे सांगत शैक्षणिक संस्थाचालक, पालकांची फसवणूक; एकाला अटक

Pune Crime News | पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून अंमली पदार्थाचा (एल.एस.डी.) मोठा साठा जप्त ! 1 कोटी 14 लाखाचे 41 हजार 986 मिलीग्रॅम LSD हस्तगत