MLA Shahajibapu Patil | मनसे-भाजप-शिंदे गटाच्या युतीवर शहाजीबापू पाटील यांचे भाष्य, म्हणाले – ‘तिन्ही पक्षाचा अजेंडा…’

सांगोला : पोलीसनामा ऑनलाइन – मााझ्या माहितीनुसार मनसे बरोबर युती (MNS-BJP-Shinde Group Alliance) होण्याला कोणतीही अडचण नाही. तिन्ही पक्षाचा अजेंडा आणि बेस हिंदुत्वाचा (Hindutva) आहे. त्यामुळे एका आधारावर या तिन्ही नेत्यांना एकत्र येण्यासाठी राजकारणात मला कोणतीही अडचण वाटत नाही, असे मत शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी व्यक्त केले आहे. आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) एका मराठी वृत्तवाहिनी बोलत होते.

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आणि शिंदे-फडणवीस हे तीन नेते मनसेने मुंबईतील दादर येथे आयोजित केलेल्या दीपोत्सवाला उपस्थित होते. मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच मंचावर आल्याने महापालिकेच्या संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू आहे. यावर आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी प्रतिक्रिया दिली.

मंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) शहाजीबापू पाटील म्हणाले, बरेच राजकीय विश्लेषक, जाणकार मंडळी येऊन भेटतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, 1995 साली आमदार असलेले काही मोजके नेते आहेत. त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ राजकीय नेते आहात. तुम्ही महाराष्ट्र फिरला आहात. तुम्हाला अनुभव आहे.
तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याला मंत्रिपद मिळाले पाहिजे, असे हे लोक मला सांगतात.
प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील जनतेला वाटते. आपला आमदार मंत्री झाला पाहिजे, तसे माझ्या मतदार संघातील लोकांनाही वाटते.

शहाजीबापू पाटील म्हणाले, मंत्रिपदाबाबत माझा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. नामदार असो किंवा नसो.
माझी सर्वात मोठी ओळख एकनाथ शिंदेंचा कडवा सैनिक ही आहे.
मला राजकारण करण्यासाठी ही ओळख आणि व्याख्या पुरेशी आहे.
त्यामुळे मी चिंता करत नाही. शहाजी बापू पाटील यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना शेवटी म्हटले की,
काय शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government), काय सणासुदीचे दिवस आणि काय तो
महाराष्ट्रात जिकडे तिकडें आनंदी आनंद.

Web Title :- MLA Shahjibapu Patil | shahaji bapu patil on yuti mns bjp shinde group alliance raj thackeray devendra fadnavis ekanth shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MLA Anil Parab | ‘साई रिसॉर्ट पाडणे आहे’ बांधकाम विभागाची वर्तमानपत्रात टेंडरसाठी जाहिरात

Zilla Parishad Recruitment | जिल्हा परिषदांमधील 13 हजार 514 पदांची भरती प्रक्रिया रद्द, 20 लाख तरुणांना धक्का