MLA Shambhuraj Desai | शंभूराज देसाईंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले-‘जेव्हापासून संजय राऊतांची संगत वाढली तेव्हापासून ते…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) नेते आणि राज्यमंत्री शंभूराज देसाई (MLA Shambhuraj Desai) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray Group Chief Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. यापूर्वी कधीही उद्धव ठाकरे यांनी टोमणे किंवा घालून पाडून बोलले नव्हते. मात्र संजय राऊतांची (Sanjay Raut) संगत वाढल्यापासून ते असं बोलायला लागले असल्याची टीका शंभूराज देसाई (MLA Shambhuraj Desai) यांनी केली आहे.

 

शंभूराज देसाई (MLA Shambhuraj Desai) म्हणाले, उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांसोबतची संगत वाढली तेव्हापासून उद्धव ठाकरे असं बोलायला लागले आहेत. मी त्यांना म्हटलं, तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार आहात, त्यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा तुमच्याजवळ आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. मात्र त्यांनी आमचं ऐकलं नाही. संजय राऊत नेमकं काय करत आहेत ते कोणासाठी काम करत आहेत हा संशोधनाचा विषय असल्याचे देसाई यांनी म्हटलं.

दरम्यान, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये 17 व्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे एकत्र विधिमंडळात (Legislature) येताना दिसले. हे दोन नेते गप्पा मारत येताना पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांमध्ये समोरासमोर संवाद झाला. यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहून बरं वाटलं. यावेळी फडणवीसांनी त्यांना सांगितले असेल, शिवसेना आता एकनाथ शिंदेंची आहे.
निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
त्यामुळे तुम्ही आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत एकत्र काम करा.

 

 

Web Title :  MLA Shambhuraj Desai | shambhuraj desai targets sanjay raut uddhav thackeray taunts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा