MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे (MLA Sharad Ranpise) यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते. आमदार रणपिसे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले. ते काँग्रेसचे (Congress) विधान परिषद गटनेते होते.

आमदार शरद रणपिसे (MLA Sharad Ranpise) यांनी पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 72 वर्षीय आ. रणपिसे यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली.
पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये चार-पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

आमदार सुरेश रणपिसे यांचा जन्म पुणे शहरात 18 सप्टेंबर 1951 साली झाला.
त्यांचे शिक्षण बी. कॉम.पर्यंत झाले होते. काँग्रेस पक्षात त्यांनी आपली राजकीय कारकिर्द केली.
ते अनेक संस्थांशी संबंधीत होते. शिवाय काँग्रेस पक्षातसुद्धा त्यांनी विविध महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती.

आमदार शरद रणपिसे हे रामराज्य शिक्षण संस्था, पुणे, उर्दू शिक्षण संस्था, इंदिरा नगर, पुणे, महाराष्ट्र युथ वेल्फेअर फांऊडेशन, पुणे आणि रामराज्य सहकारी बँकेचे संस्थापक होते.
ते 1979-85 या कालावधीत पुणे महापालिकेचे नगरसेवक तर 1983-84 ला गलिच्छ वस्ती निर्मूलन, गृहनिर्माण व समाज कल्याण समितीचे अध्यक्ष होते.

तसेच 1994-95 मध्ये ते उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, पुणे चे सदस्य होते.
1969 ते काँग्रेस पक्षाचे सदस्य होते तर 1978 मध्ये ते पुणे शहर इंदिरा काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य होते.
1973 साली त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली होती.

 

Web Title : MLA Sharad Ranpise | Congress Legislative Council group leader MLA Sharad Ranapise dies of heart attack in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन

Nagpur Crime | पत्नीचं दुसर्‍याशी होतं ‘लफड’, पती ठरत होता ‘अडसर’; 3 लाखाच्या सुपारीनंतर घडलं असं काही…

LIC ने सर्व पॉलिसीधारकांसाठी जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या अन्यथा…