MLA Shivendra Raje Bhosale | आमदार शिवेंद्रराजे यांचा टोला; म्हणाले – ‘साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो उदयनराजेंमुळे’ (व्हिडीओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  MLA Shivendra Raje Bhosale | सातारा जिल्हा बँकेची (Satara District Bank Election) रणधुमाळी सुरू झालीय. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. 25) रोजी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) यांनी त्यांच्या पारंपरिक गृहनिर्माण मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेसोबत (MLA Shivendra Raje Bhosale) ना. रामराजे, ना. निकबळकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभुमीवर खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं आहे.

 

खासदार उदयनराजे यांनी आज (मंगळवारी) आमदार शिवेंद्रसिंहराजे  यांच्यावर सहकारी संस्था मोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका केली.
तसेच, त्यांनी 10 तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यावे, असे आवाहन देखील केलं आहे.
यावरून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या संस्थेच्या निवडणुकीला येऊन त्यांनी बोलावे ही संस्था चांगली चालली आहे आणि चालवली आहे, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

आमदार शिवेंद्रराजेंना सवाल करण्यात आला की, खा. उदयनराजेंना पॅनलमध्ये घेणार का? यावर उत्तर देताना शिवेंद्रराजे म्हणाले की, मीच पॅनलमध्ये आहे हे मलाच माहीत नाही.
पॅनलचा निर्णय शरद पवार, अजित पवार घेतील त्यांना त्यांनी बोलावं, असे सांगत आपल्या साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता तो मीच सुरू केला आहे.
असे स्टेटमेंट उदयनराजेंकडून येईल अशी टिचकी वाजवत आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना टोला लगावला.

 

Web Title : MLA Shivendra Raje Bhosale | oxygen comes to satara because of mp udayan raje bhosale says mla shivendra raje bhosale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parambir Singh | परमबीर सिंग यांना ‘फरार’ घोषित करण्याची शक्यता; पगार थांबवला

Pune NCP | चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ विधान म्हणजे उच्च दर्जाची मनोरंजन सेवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांचा ‘घणाघात’ (व्हिडीओ)

Chitra Wagh | ‘जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय’ (व्हिडीओ)