MLA Shivendraraje Bhosale | साताऱ्यात कंदी पेढे वाटून आमदार शिवेंद्रराजेंचं मोठं विधान; म्हणाले – ‘राज्यात लवकरच परिवर्तन’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Shivendraraje Bhosale | विधानपरिषदेच्या निकालानंतर (Maharashtra MLC Election) आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जवळपास 25 आमदारांसह नॉट रिचेबल असल्याने भाजप (BJP) नेत्यांकडूनही अनेक कमेंट केल्या जात आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात असल्याची मोठी चर्चा देखील राज्यात रंगली आहे. एकनाथ शिंदे सध्या सूरतमधील एका हाॅटेलमध्ये असल्याची माहिती आहे. अशातच साताऱ्यातील भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांनी देखील यासंदर्भात मोठा दावा केला आहे.

 

भाजप नेत्यांकडून ट्विटरच्या माध्यमातून आणि माध्यमांना प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टिका करण्यात येत आहे. त्याचबरोबर, लवकरच राज्यात सरकार बदलणार असल्याचेही चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) म्हणाले, “राज्यात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या योग्य नियोजनामुळे पुढील काळात राज्यामध्ये परिवर्तनाची नांदी पाहायला मिळेल. प्रामुख्याने महाविकास आघाडीत असलेली धुसफूस या सर्वांना कारणीभूत असल्याचे सांगत राज्यामध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल,” असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

 

शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेमध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद उत्सव साताऱ्यातील मोती चौक येथे कंदी पेढे वाटप करुन साजरा केला. त्या दरम्यान, बोलताना शिवेंद्रराजेंनी मोठं विधान केलं आहे. दरम्यान सध्या चाललेल्या राजकीय घडामोडीनंतर यावर तोडगा काय निघेल हे पाहावे लागणार आहे. मात्र, राज्यात घडलेल्या धक्कादायक राजकीय घडामोडी संदर्भात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

 

एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील 25 आमदार देखील असल्याचे सांगण्यात येत आहे.
ते सध्या गुजरातच्या सूरतमधील मेरेडियन हॉटेलमध्ये (Meridian Hotel) असल्याची माहिती समोर आली आहे.
हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि गुजरात भाजपाच्या नेत्यांनीही शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 

Web Title :- MLA Shivendraraje Bhosale | soon change in the state shivendra rajes
prediction by distributing kandi plants in satara on eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा