MLA Siddharth Shirole | 23 गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन सोपवावे – आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई – MLA Siddharth Shirole | महापालिका हद्दीतील २३ गावांना सोयी-सुविधा पुरविणाऱ्या पुणे महापालिकेलाच Pune Municipal Corporation (PMC) स्पेशल प्लॅनिंग ॲथॉरिटी (PMC Special Planning Authority) नियुक्त करुन नियोजनाचे अधिकार द्यावेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांनी विधानसभेत (Vidhansabha) लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत आज (गुरुवारी) केली.
महापालिकेतील २३ गावांच्या समावेशाबाबत लक्षवेधी सूचना आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी मांडली. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत आमदार शिरोळे यांनी भाग घेतला.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश जेव्हा करण्यात आला त्यावेळेस
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने (Mhavikas Aghadi Govt) पीएमआरडीएला स्पेशल प्लॅनिंग ॲथॉरिटी
(PMRDA Special Planning Authority) म्हणून नियुक्त केले होते.
परंतु या २३ गावांमध्ये सर्व सोयी-सुविधा पुणे महानगरपालिका पुरविते आणि महसूल मात्र पीएमआरडीए वसूल करते.
याकरिता पीएमआरडीएझ ऐवजी सोयी-सुविधांची कामे करणाऱ्या पुणे महानगरपालिकेलाच नियोजनाचे
अधिकार देऊन स्पेशल प्लॅनिंग ॲथॉरिटी म्हणून नियुक्त करावे,
अशी मागणी आमदार शिरोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचेकडे यावेळी केली.
Web Title :- MLA Siddharth Shirole | Planning for the development of 23 villages should be entrusted to the Pune Municipal Corporation – MLA Siddharth Shirole
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update