शिरूर-हवेलीचे आमदार सेल्फ होम क्वारंटाईन

शिक्रापुर : प्रतिनिधी –  शिरूर तालुक्यातील पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या संपर्कात आल्याने शिरूर-हवेलीच्या नागरिकांसाठी, शेतकरी, जनतेकरिता सुरक्षितता म्हणून शिरूर-हवेली आमदार अशोक पवार यांनी होम क्वारंटाईन होण्याचा घेतला असून पुढील

पुढील पाच दिवसांसाठी आमदार सेल्फ होम काॅरंटाईन राहणार आहेत.

याबाबतचे मेसेज सोशल मिडिया वर फिरत असल्याने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आले आहे. गेल्या चार साडेचार पाच महिन्यापासून शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार कोरोना ग्रस्तांसाठी , परप्रांतीय कामगार, गोरगरीब नागरिक ,तसेच सर्वसामान्यना मदतीचा हात देण्यात दिवस-रात्र फिरत होते. प्रशासनाबरोबरच चर्चा त्यांच्याबरोबर दौरे त्याबरोबर तालुक्यातील विकास कामे, रस्त्यांची कामे याकडेही त्यांचे मोठ्या प्रमाणात लक्ष होते. कोरोना संसर्गाच्या महामार्ग च्या काळात सुद्धा ते स्वतः पुढाकार घेऊन सर्व व्यवस्थेची ,आपत्ती व्यवस्थापन आरोग्य अधिकारी कोविड सेंटर उभारणे, त्याबरोबर जिल्हाधिकारी प्रांत अधिकरी, पोलीस अधीक्षक,तर पुण्यामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांवर बिल कमी करण्यापासून त्यांना ऍडमिट करण्यापर्यंत सर्व दिवस-रात्र काम त्यांची चालू होती. तर अनेकांच्या अडचणी समजावून घेऊन त्यावर उपाय योजनाही ते तातडीने करत . परंतु शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आल्यामुळे शिरूर-हवेलीचे आमदार ॲड् श्री अशोक पवार हे पुढील पाच दिवसांसाठी सेल्फ होम काॅरंटाईन झालेले आहेत. आमदार अशोक पवार यांची प्रकृती स्थिर असून केवळ संपर्कात आल्यामुळे ते स्वतःहून स्वतःबरोबर नागरिक जनता यांच्यासाठी सुरक्षितता म्हणून होम क्वारंटाईन झाले आहेत..