MLA Suhas Kande | शिवसेना आमदार सुहास कांदे यांना छोटा राजन टोळीकडून धमकी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  नांदगाव मतदारसंघासाठी (Nandgaon constituency) जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीच्या वाटपावरुन राजकारण चांगलेच पेटले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात शिवसेनेचे (Shivsena) आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी उच्च न्यायालयात (bombay high court) याचिका दाखल केली आहे. दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांना थेट छोटा राजन टोळीकडून (chhota rajan gang) धमकीचा (Threat) फोन आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

याप्रकरणीस सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी मंगळवारी (दि.28) दुपारी पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला आहे.
नांदगाव मतदार संघामध्ये आलेल्या निधीचे समान वाटप केले नसल्याचा आरोप करत कांदे यांनी 5 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत रिट पिटिशन (Writ petition) दाखल केली.
याशिवाय पालकमंत्री भुजबळ यांच्याविरुद्ध पुरावेही दाखल केल्याचे कांदे यांनी तक्रारीत नमुद केले आहे.

सोमवारी कांदे हे गंगापुर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीतील आनंदवली येथील त्यांच्या घरी असताना संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) या व्यक्तीने फोन केला.
यावेळी त्याने मी अक्षय निकाळजे बोलत आहे, मी छोटा राजनचा पुतण्या असून तुम्ही उच्च न्यायालयात जी रिट पिटिशन दाखल केली आहे.
ती कढून घ्या अन्यथा तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी चांगले होणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

कांदे यांनी फोन कट केल्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास त्याच क्रमांकावर फोन केला. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
कांदे यांनी आज पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय (Police Commissioner Deepak Pandey) यांच्याकडे केलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.
सुहास कांदे यांच्या तक्रार अर्जावर पोलीस काय पावले उचलणार याकडे लक्ष लागले आहे.

 

Web Title : MLA Suhas Kande | nashik district mla suhas kande threatened chhota rajan gang

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jalgaon Crime | जळगावमधील धक्कादायक घटना; लग्नाचे आमीष दाखवून डॉक्टर तरुणीवर परिचारकाकडून अत्याचार

Khadakwasla Constituency | खडकवासला मतदार संघातील तब्बल 32 हजार 124 मतदारांची नावे वगळली जाणार

Pune Court | फसवणूक प्रकरण ! मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंचा जामीन फेटाळला; कुटुंबियांनी कॉसमॉस बँकेचे साठ कोटींचे कर्ज थकवले