MLA Sunil Kamble | ‘सामान्यांची आरोग्यसेवा स्तुत्य उपक्रम’ – आमदार सुनील कांबळे यांचे प्रतिपादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sunil Kamble | सध्या मोठ्या हॉस्पीटलमध्ये आरोग्याबाबत साधे उपचार करायचे म्हटलं तरी खूप खर्च येतो. आज भाजप महिला आघाडीच्या वतीने सामान्यांसाठी अल्पदरात व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी व्यक्त केले.

 

भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडी डॉक्टर सेल व एम्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत व अल्पदरात सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भवानी पेठेतील सोनावणे रुग्णालय आयोजित या शिबिराला अनेक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

 

या शिबिरामध्ये हृदयाच्या तपासण्या प्रोसिजर्स अँजिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी, इतर सर्व शस्त्रक्रिया तसेच जनरल सर्जरी, मेंदूच्या शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, मणक्याचे, ऑर्थोपेडिक, सांधे बदलणे, बॅरिॲट्रिक, नेफरोलॉजी, स्त्रीरोग, सर्व प्रकारच्या लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया, कॅन्सर वरील उपचार केमोथेरपी, अशा अनेक आजाराबाबत उपचार आणि मोफत ऑपरेशन केले जाणार आहेत. (MLA Sunil Kamble)

शिबिराचे आयोजन पुणे शहर महिला आघाडी भाजप अध्यक्षा अर्चना पाटील (Corporator Patil Archana Tushar)
व महिला आघाडी डॉक्टर प्रकोष्ठ अध्यक्ष डॉ. सुप्रिया कुलकर्णी (Sr. Supriya Kulkarni) यांनी केले होते.
यावेळी माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील, प्रभाग19 चे अध्यक्ष सनी अडगले, युवा मोर्चा चिटणीस आशिष झांजोट,
ओबीसी मोर्चाचे दिनेश रासकर, विश्वास घोलप, एम्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चे डॉ. मलिक,
डॉ. दुबे, डॉ. रोकडे मॅडम, नीता गायकवाड, परवीन तांबोळी आणि मोठ्या संख्येने भाजप चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title :- MLA Sunil Kamble | ‘Commendable healthcare initiative of common people’ – Statement of MLA Sunil Kamble

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon Bhusaval News | भुसावळमध्ये भाजपच्या तब्बल 30 नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

TET Exam | टीईटी परीक्षेत कोट्यवधींची उलाढाल ! तुकाराम सुपेंच्या घरातून 90 लाखांचा ऐवज जप्त – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (व्हिडीओ)

Ananya Panday Hot Photos | अनन्या पांडेच्या ‘या’ फोटोनं सोशल मीडियावर लावली आग, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Katrina Kaif First Rasoi | कैटरिना कैफनं शेअर केला ‘पहिल्या रसोई’चा फोटो, विक्की कौशल आणि कुटुंबासाठी बनवली खास स्वीट डिश..!

Vehicle Registration Certificate | कारचे RC हरवले असेल तर ‘नो-टेन्शन’? जाणून घ्या ‘डुप्लीकेट’ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तयार करण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत