MLA Sunil Kamble | अखेर पोलिसांच्या अर्जित रजेचा शासन निर्णय रद्द, आमदार सुनील कांबळेकडून निर्णयाचे स्वागत

पोलिसांच्या मूलभूत न्याय हक्काचं संरक्षण करणे हे लोकप्रतिनिधींची जबाबदारी – आमदार सुनील कांबळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sunil Kamble | राज्यातील पोलीस दलांतर्गत असलेल्या कामाचा व्याप, जबाबदारी इत्यादी बाबी विचारत घेऊन पोलीस शिवाई ते पोलीस निरीक्षक या पदांकरता त्यांना 20 दिवसांच्या नैमित्तिक रजा आणि 15 दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतींसह मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र, आता राज्य सरकारने पोलिसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्यचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे पुणे कॅन्टोन्मेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे यांनी स्वागत केले आहे.(MLA Sunil Kamble)

दि. 21 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदांकरिता 15 दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला. परंतू, आपल्या पोलीस बांधवांसाठी हे सोयिस्कर नाही, कारण पोलीस बांधवांना दर आठवड्याला एक साप्ताहिक ती पण मिळतेचं असं नाही, आपले पोलीस बांधव ड्युटीसाठी 24 तास बांधिल असतात. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा असे पत्र आमदार सुनील कांबळे यांनी गुरुवारी ( दि.22) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते.

आमदार सुनील कांबळे यांच्या पत्राची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दखल घेऊन हा शासन निर्णय तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले आहे. राज्याच्या गृहविभाने शुक्रवारी (दि.23) नवीन शासन निर्णय जारी करुन 21 फेब्रुवारीचा शासन निर्णय रद्द केला आहे. गृहविभागाने (Maharashtra Home Department) काढलेल्या नव्या शासन निर्णयाचे आमदार सुनील कांबळे यांनी स्वागत करुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

Raj Thackeray-Manohar Joshi | मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंचा शोकसंदेश, ”शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न…”

Maharashtra IAS Transfers | राज्यातील 12 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या ! कविता व्दिवेदी यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी नियुक्ती तर पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालकपदी कार्तिकी एन एस यांची नियुक्ती

Pune Bibvewadi Crime | पुणे : सिनेस्टाईल पाठलाग करुन तरुणावर धारदार हत्याराने वार, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR