MLA Sunil Tingare | सिद्धार्थनगर रस्ता बाधितांना हक्काची घरे मिळावीत व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, आमदार सुनिल टिंगरे विधानसभेत मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची (Wandering Dogs) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील काही महिन्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात नागारिक जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. लहान मुलांवर देखील कुत्र्यांकडून हल्ला होत आहे. त्यामुळे मोठ्या मासणांसह लहान मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingare) यांनी केली आहे. तसेच सिद्धार्थनगर रस्ता बाधितांना हक्काची घरे मिळावीत अशी देखील मागणी आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingare) यांनी विधानसभेत केली आहे.

 

सिद्धार्थनगर रस्ता बाधितांना हक्काची घरे मिळावीत
सिद्धार्थनगर (Siddhartha Nagar) रस्ता बाधितांना हक्काची घरे मिळावीत यासाठी मी सातत्याने लढतोय. या लढायला आता यश येते आहे, मात्र असे असतानाच ज्या ट्रांजिट कॅम्पमध्ये सिद्धार्थनगर रस्ता बाधित नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तेथील जागेवर जप्तीची कारवाई करून या नागरिकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न शुक्रवारी करण्यात आला. ही बाब मला येथील नागरिकांकडुन समजल्यानंतर मी तात्काळ विधानसभेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ (Point of Information) च्या माध्यमातून या गंभीर मुद्द्याकडे संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले. त्याची तातडीने दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी अशा पद्धतीने पात्र झोपडपट्टी धारकांवर कारवाई करणे चुकीचे असल्याचे सांगत यावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी असे आदेश सरकारला दिले. त्यामुळे ही कारवाई लगेचच थांबवण्यात आली. सिद्धार्थनगरवासियांना त्यांच्या हक्काचे घर मिळेपर्यंत माझी ही लढाई अशीच सुरू राहील, असे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingare) यांनी सांगितले.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
पुणे महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे.
२९ डिसेंबर २०१७ मध्ये चंदननगर भागामध्ये एका दीड वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता.
यामध्ये त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. तसेच १० फेब्रुवारी २०२३ मध्ये ब्रम्हा सनसिटी या सोसायटीमध्ये चार-पाच कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला होता.
पुणे शहरात सुमारे साडेतीन लाख भटक्या कुत्र्यांची संख्या आहे.
२०२२ या वर्षात भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या १३ हजार १४८ घटना घडल्या आहेत.
या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

 

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही अत्यंत गंभीर बाब मी अधिवेशनात सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
तसेच याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन श्वान नसबंदीचा वेग वाढविणे,
कुत्र्यांसाठी शेल्टरची व्यवस्था करणे तसेच हौसिंग सोसाट्यांमध्ये कुत्री पाळण्यासंदर्भात नियमावली तयार करावी,
अशी मागणी केली असल्याची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली.

 

Web Title :- MLA Sunil Tingare | MLA Sunil Tingre demands that the Siddharthnagar road affected people should get their rightful houses and stray dogs should be taken care of

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Chinchwad Crime | हातात कोयते घेऊन टोळक्याचा राडा, पिंपरीतील बौद्धनगर मधील घटना; 9 जणांवर FIR

CM Eknath Shinde | राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्था केंद्र सरकारच्या रडारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”

Chhatrapati Sambhaji Nagar Accident | एसटी आणि गॅस सिलेडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोमध्ये भीषण अपघात, 10 जणांची प्रकृती चिंताजनक; टेम्पो चालकाचा मृत्यू