MLA Sunil Tingre On Illegal Business | वडगाव शेरी मतदारसंघातील अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करा; आमदार सुनिल टिंगरे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
विमाननगर, कल्याणीनगर, खराडी, लोहगाव तसेच विश्रांतवाडीसह अन्य भागात मोठ्या प्रमाणात पब, टेरेस (रुफटफ) हॉटेल अनधिकृतरित्या सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sunil Tingre On Illegal Business | वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील (Vadgaon Sheri Assembly constituency) अनधिकृत पब (Authorized Pub), टेरेस हॉटेल (Terrace Hotel) आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी (Action should be taken against the illegal business) अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्याकडे केली आहे. यावेळी आयुक्तांनी (Pune Police) यासदर्भात तात्काळ कारवाईची मोहीम राबविण्यात येईल असे आश्वासन दिले. (MLA Sunil Tingre On Illegal Business)
आमदार टिंगरे यांनी कल्याणीनगर परिसरातील नागरिकांसह पोलिस आयुक्त कुमार यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्ताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विमाननगर (Viman Nagar), कल्याणीनगर (Kalyani Nagar), खराडी (Kharadi), लोहगाव (Lohegaon) तसेच विश्रांतवाडीसह (Vishrantwadi) अन्य भागात मोठ्या प्रमाणात पब, टेरेस (रुफटफ) हॉटेल अनधिकृतरित्या सुरु आहेत. हे पब आणि हॉटेल रात्री उशिरापर्यत सुरु असतात.
त्याठिकाणी सुरु असलेल्या कर्णकर्कश साउंड सिस्टीमचा या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच हॉटेल/पब मध्ये तरुणवर्ग मद्यधुंद होऊन बाहेर पडतो. त्यामुळे अनेकदा अनुसुचित घटना घडतात. तसेच अनेक ठिकाणी बेकायदा दारू विक्री, हुक्का पार्लर (Hookah Parlour Pune) , मटका धंदा (Mataka), पत्याचे क्लब, अमली पदार्थ विक्री, मसाज पार्लर (Massage Parlour In Pune) व लॉज गैरप्रकार चालू आहेत. या सर्व अनधिकृत हॉटेल, पब व बेकायदा व्यवसायावर त्वरित कारवाई करण्यात यावी. पोलिसांनी याबाबत कारवाईस टाळाटाळ केल्यास विधी मंडळाच्या पावसाळी अशिवेशनात या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधू असेही आमदार टिंगरे यांनी म्हटले आहे. (MLA Sunil Tingre On Illegal Business)
यावेळी त्यांच्या समवेत कल्याणीनगर येथील रचना अग्रवाल, इक्बाल जाफर, मोनिका शर्मा, सुमित कर्णिक,
मुनीर वसतांनी, किरण म्हलोत्रा, निलेश चौहान, सचिन आगाशे आदी नागरिक उपस्थित होते.
Web Title : MLA Sunil Tingre On Illegal Business | Take action against unauthorized pubs, terrace hotels and illegal
businesses operating illegally in Vadgaon Sherry Constituency; MLA Sunil Tingre’s request to the Commissioner of Police
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Pmc Property Tax | स्वत: वापरत असलेल्या मिळकतीची थकबाकी नसल्यास केवळ 2023-24 या वर्षाचा मिळकत कर भरावा
- Pune SARTHI | सारथी संस्थेमार्फत शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी निवासी प्रशिक्षणाचे आयोजन
- Chandrakant Patil Birthday | चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांना ‘औषध पेटी’चे वाटप; संदीप खर्डेकर मित्र परिवाराचा सुत्य उपक्रम