MLA Sunil Tingre | विश्रांतवाडी चौकातील बुध्द विहार स्थलांतरीत करण्यास परवानगी; धानोरी- लोहगावकडे जाणारी वाहतूक कोंडी सुटणार
आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sunil Tingre | विश्रांतवाडी चौकातील (Vishrantwadi Chowk) रस्त्यावर असलेले बुद्ध विहार (Buddha Vihar Vishrantwadi) स्थलांतरीत करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी मंजुरी दिली आहे. येथील वॉटर वर्क्स आणि प्ले ग्राउंडच्या आरक्षित जागेवर हे बुद्ध स्थलांतरीत होणार आहे. त्यामुळे धानोरी-लोहगावकडे (Dhanori Lohegaon Road) जाणार्या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. (MLA Sunil Tingre)
वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी ही माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून विश्रांतवाडी चौकात सुमेध बुद्ध विहार आहे. थेट चौकात आणि जवळपास अर्ध्या रस्त्यावर असलेल्या या बुध्द विहारामुळे धानोरी तसेच लोहगाव परिसरात जाणार्या वाहनाना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हे बुध्द विहार स्थलांतरित करुन येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. आमदार सुनिल टिंगरे यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडविण्यासाठी महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. त्यावेळी त्यांनी हे बुध्द विहार स्थलांतरीत करून वाहतुक कोंडी सोडविण्याची आग्रही मागणी केली होती.
त्यानंतर प्रशासनाने त्यावर कार्यवाही सुरू केली. यासदर्भात अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आमदार टिंगरे यांच्यासह संबंधित सर्व विभागांच्या अधिकार्यांची बैठक घेतली होती. त्यात येथील वॉटर वर्क आणि प्ले ग्राऊंडच्या आरक्षित जागेवरील 200 चौरस मीटर जागेवर हे बुद्ध विहार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार करुन तो आयुक्तांच्या मंजुरीसाठी ठेवला होता. मंगळवारी आयुक्तांनी या प्रस्तावास मंजुरी दिल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले. त्यानुसार आता लवकरच हे बुद्ध विहार स्थलांतरित होऊन या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. (MLA Sunil Tingre)
नागरिकांची अडचण लक्षात घेऊन हे बुद्ध विहार स्थलांतरीत करण्यासाठी बुध्द विहाराचे अध्यक्ष राजीव बेंगळे यांच्यासह (PMC’s City Engineer) पालिकेचे नगराभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare), पथ विभागाचे व्ही. जी. कुलकर्णी (V.G. Kulkarni PMC) , बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे (Rohidas Gavhaṇe PMC),
बिपीन शिंदे (Bipin Shinde PMC), पथ विभागाचे अधिकारी मिरा सबनीस,
संजय धारव तसेच एसआरए भूमी जिंदगी विभाग यासंर्वाची मोलाची मदत झाल्याचे आमदार टिंंगरे यांनी सांगितले.
विश्रांतवाडी चौकातील वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. हे बुध्द विहार स्थलांतरीत झाल्यामुळे लोहगाव-धानोरीकडे जाणारी
वाहने आता विना अडथळा जाऊ शकतील. तसेच लवकरच या चौकातील उड्डाणपुलाच्या कामाच्या
निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून पुलाचे काम होऊन येथील कोंडीचा प्रश्न कायम स्वरुपी सुटेल.
– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.
Web Title : MLA Sunil Tingre | Permit to relocate Budh Vihar in Vishrantwadi Chowk;
The traffic jam going to Dhanori- Lohgaon will be relieved
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | पुण्यातील रास्ता पेठेतुन 11 लाखाचे अंमली पदार्थ (MD Drugs) जप्त, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-2 ची कारवाई
- Pune Crime News | पुण्यातील बिबवेवाडीत युवकाचा दगडाने ठेचून खून
- Slum Rehabilitation Tender | मुंबईतील धारावी प्रमाणे पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसनसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार